ठाणेदार संग्राम पाटील यांचे नेतृत्त्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाची कार्यवाही
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli police) : रात्री 10.30 वा. सुमारास नवदुर्गा विसर्जन बंदोबस्त असल्याने पोलीस निरीक्षक संग्राम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त करीत असतांना जयस्तंभ चौकात (Chikhli police) पोलीसांची गाडी पाहुन तक्रारदार तुषार रघुनाथ साळोख वय 21 वर्ष रा. मुरादपुर हे पळत आले व त्यांनी माहीती दिली की, ते पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी जात असतांना 4 अनोळखी इसमांनी जबरीने हातातील मोबाईल हिसकावुन, चापटा बुक्यांनी मारहाण करुन जिवाने ठार मारण्याची धमकी दिली आहे.
सदर माहीती प्राप्त होताच ठाणेदार संग्राम पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सदर पथकाने आरोपी भंगार गल्ली परीसरात अंधाराचा फायदा घेऊन पळुन जात असतांना पाठलाग करुन 2 इसमांना पकडुन पोलीस स्टेशनला हजर केले. (Chikhli police) पकडलेल्या इसमांना विचारपुस करुन नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव समीर खॉ इसार खा पठाण वय 21 वर्ष, सलमान इरफान पठाण वय 25 वर्ष असे सांगीतले व त्यांचे पळुन गेलेले सहकारी संदीप रामदास बाबर व योगेश प्रकाश शिंदे सर्व राहणार. शेलसुर यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
फिर्यादी तुषार रघुनाथ साळोख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन चिखली गु. र. नं. 765 / 2024 कलम 309 (4), 115 (2), 352, 351 (2) (3), 3 (5) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सदर गुन्ह्यातील पळुन गेलेले आरोपी यांचा शोध घेत असतांना ते बस स्थानक परीसरात लपुन असल्याची गोपनिय माहीती मिळताच सदर ठिकाणी जाऊन बस स्थानक परीसरात अंधारात लपुन बसलेले असतांना त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अटक अरोपीतांच्या ताब्यातुन 1 मोबाईल किंमती 10,000/- रुपयाचा जप्त करण्यात आला असुन आरोपी 1) समीर खॉ इसार खा पठाण वय 21 वर्ष 2) सलमान इरफान पठाण वय 25 वर्ष 3) संदीप रामदास बाबर वय 22 वर्ष 4) योगेश प्रकाश शिंदे वय 18 वर्ष सर्व रा. शेलसुर यांना आज रोजी मा. न्यायालया समोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींची बुलडाणा जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधीक्षक बि. बी. महामुणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात पोउपनि नितीनसिंह चौहाण, पोना अमोल गवई, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, रोहीदास पंढरे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, निलेश सावळे, माया सोनुने व रुपाली उगले यांनी केली आहे.