तहसिलदार संतोष काकडे यांचे आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhli Tehsildar) : दिनांक ३० ऑगस्ट रोजी अंतिमरीत्या प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मतदार यादी येणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक करिता वापरण्यात येणार असल्याने मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही खात्री करुन घेण्यासाठी मतदारांनी मतदार यादयांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे (Tehsildar) चिखली तहसिलदार संतोष काकडे (Tehsildar Santosh Kakade) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे की, भारत निर्वाचन आयोगाचे पत्र दिनांक १ ऑगस्ट नुसार सुधारीत कार्यक्रमानुसार येणाऱ्या सार्वत्रिक (Assembly Constituency) विधानसभा निवडणूकीमुळे दिनांक ३० ऑगस्ट रोजी अंतिमरीत्या मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही खात्री करुन घ्यावी, मतदार यादीमध्ये आपले नाव नसल्यास आपले संबंधित नजीकचे मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह दिनांक ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत विहीत नमुना ६ भरुन द्यावा. मतदार यादीतील नावात चुकीची दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना ८ भरुन द्यावा, तसेच नागरीक Voter helpline app व निवडणूक आयोगाची साईट Voterportal.eci.gov.in यावर देखील स्वतः आपले नाव समाविष्ट करु शकता.
या कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या सुविधेसाठी २३-चिखली विधानसभा मतदारसंघात (Chikhli Assembly Constituency) पुढील ०५ नवीन मतदार केंद्र तयार करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहेत- चांधई (धोडप), कोलारी, गिरोला, नगर परीषद व्यायाम शाळा गांधी नगर, चिखली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली तसेच ज्या मतदान केंद्रावर १४ शे किंवा त्यापेक्षा जास्त मतदार आहेत त्याठीकाणी मतदारांची गर्दी टाळण्यासाठी अशा १० मतदान केंद्रावरील मतदार नजीकच्या मतदान केंद्राचे यादीभागात समाविष्ठ करण्यात आले आहे. असे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शरद पाटील, तसेच (Tehsildar Santosh Kakade) तहसिलदार संतोष काकडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.