चिखली/बुलढाणा (Chikhli Tehsildar) : चिखली तालुका (Chikhli taluka) हा भौगौलीकदृष्टया मोठा असुन तालुक्यात १४४ गावाचा समावेश आहे. त्यापैकी काही गावे ही तालुका मुख्यालयापासुन ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असल्याने प्रशासकीय अडचणीमुळे नागरीकांना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे (Chikhli Tehsildar) तहसिलदार संतोष काकडे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेवून (Ration card) रेशनकार्ड विषयक तक्रारींचा निपटारा व विविध प्रकारचे कामे गाव स्तरावरच तलाठ्या मार्फत होणार असल्याचे सांगीतले आहे.
तहसिलदार यांचा अभिनव उपक्रम
तहसिलदार यांनी कळविले की, चिखली तालुक्यात (Chikhli taluka) महसुल प्रशासन तसेच पुरवठा विभागातर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नविन , विभक्त रेशन कार्ड काढणे , रेशन कार्डची दुय्यम प्रत काढणे, रेशन कार्ड मधील नाव कमी करणे , रेशन कार्डमध्ये नाव सामाविष्ट करणे इत्यादी रेशन कार्ड संबधित अर्जाचे नमुने गावपातळीवर पुरविण्यात येणार आहेत. (Ration card) रेशनकार्ड लाभार्थी /अर्जदार यांनी आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह परीपूर्ण भरून गावातील तलाठी यांचेकडे जमा करावेत. जमा केलेल्या अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर रेशनकार्ड अथवा प्रमाणपत्र गावातील तलाठी यांचे मार्फतच संबधित लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. जेणेकरुन लाभार्थ्यांना उक्त कामासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. पर्यायाने नागरीकांचा वेळ व पैसा दोन्हीची बचत होईल. असे आवाहन (Chikhli Tehsildar) तहसिलदार चिखली संतोष काकडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.