मेरा बु फाट्यावर घडली घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (ST bus) : सरकार विविध सवलती जाहीर करून महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठ महिला पुरुषांना एसटी बस मध्ये मोफत प्रवास सुरू केला आहे. परंतु प्रत्येक एसटी बस मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे होणारी गर्दी पाहून काही बस चालक (ST bus) आपली मनमानी करत प्रवाशांना त्रास देत आहेत. असाच प्रकार २२ ऑगस्ट रोजी चिखली ते बिबी एसटी बस चालक खाली उतरून प्रवाशांना लोटपाट केली . ही घटना मेरा फाट्यावर सकाळी १०.३० वाजता घडली.
चिखली बसस्थानक प्रमुख जोगदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दिडशे गावासह बाहेर पल्याच्या एकूण केवळ ३६५ एसटी बसेस आहेत . अजुनही तब्बल २५ ते ३० गाड्यांची कमतरता असल्यामुळे नियोजन करताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. शिवाय नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी बस मिळत नसल्याने तासनतास थांबून खाजगी वाहनाने जावे लागत असल्यामुळें आथिर्क भुर्दंड सोसावा लागतो आहे. मेरा बु हे गाव १५ ते २० हजार लोकसंख्येचे असल्याने तालुक्याला जाण्या येण्यासाठी प्रवाशांची मोठीं गर्दी असते त्यामध्ये मागील काही वर्षांपासून चिखली ते गुंजाळा प्रवाशी (ST bus) एसटी बस नियमित सुरू असल्याने प्रवाशांना फार सोईचे झाले होते.
परंतु गाड्यांची कमरता असल्याने गेल्या दोन महिन्या पासून ही प्रवाशी फेरी सकाळच्या वेळेची तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एकमेव चिखली वरुण मेरा बु गावातून बिबी येथे जाणारी ही प्रवाशी फेरी आहे. या चिखली ते बिबी बसवर दररोज मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. आज सकाळी चिखली ते बिबी बस क्र एम एच ४० एन ९५८४ ही बीबी वरुण चिखली कडे जात असताना मेरा बु गावात प्रवाशी घेणयासाठी थांबली असता प्रवाशी गाडी मध्ये बसण्यासाठी एकमेकात चढाओढ करू लागले . हा प्रकार पाहून (ST bus) बस चालक हे खाली उतरून महिलांना लोटपाट करूण अरेरावी करत प्रवाशांच्या अंगावर धावत जावू लागले. अशी ही बस चालकाची अरेरावी पाहून गावकरी गोळा झाले. मात्र या ठिकाणी काही अनर्थ ओढवला जावू शकतो हे पाहताच (ST bus) बस चालकाने दरवाजा बंद करून बस घेवून गेला. अशी मनमानी व आरेरावी करणाऱ्या बसचालकावर व्यवस्थापक यांनी कार्यवाही करावी अशी ओरड प्रवाशांकडून केली जात आहे.