गंगाखेड (child crime) : लहान मुलगा सायकल खेळताना लागलेल्या सायकलच्या धक्क्यातून (child crime) लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दिनांक १ मे रोजीच्या सायंकाळी गंगाखेड शहरातील लहुजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी (Parbhani police) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीत दोन्ही गटातील पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सायकल खेळत असताना मारामारी
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील लहुजी नगरमध्ये राहणाऱ्या नेहा गंगाधर जाधव यांचा (child crime) लहान मुलगा आशिष हा दिनांक १ मे रोजी सायंकाळी ७ बाजेच्या सुमारास सायकल खेळत असताना याच भागात राहणाऱ्या राधा विलास गायकवाड यांच्या शुभम नावाच्या मुलास सायकलचा धक्का लागल्याने शुभम याने आशिष यास चापट मारली. याबाबत नेहा गंगाधर जाधव यांनी शुभमची आई राधा विलास गायकवाड यांना विचारपूस केली असता सायंकाळी ७ ते ७:३० बाजेच्या सुमारास राधा विलास गायकवाड, निलाबाई त्रिंबक जाधव, सचिन त्रिंबक जाधव, सचिन याची बहीण गौरी, सचिनची मावशी कलबाई, दिपक त्रिंबक जाधव, त्रिंबक जाधव, सचिनची पत्नी सर्व राहणार लहुजी नगर गंगाखेड, श्रीकांत, राष्ट्रपाल, वरसला राहणार रमाबाई नगर गंगाखेड व बॉबी राहणार आश्रम शाळेजवळ गंगाखेड यांनी फिर्यादी नेहा जाधव यांच्या आईच्या घरात येऊन तुझ्या मुलाला मारहाण केल्याबाबत का विचारले. या कारणावरून सचिन जाधव व दिपक जाधव याने लोखंडी पाईपने व त्रिंबक जाधव याने काठीने फिर्यादीच्या मानेवर, कमरेवर मारहाण करून दुखापत केली.
आमच्या नादी लागाल तर खतम…
भांडणं सोडविण्यासाठी आलेल्या आई बबिता गंगाधर जाधव व व्यंकटराव संतराम रेड्डी यांना ही वरील सर्वांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी पाठीत, पोटात, तोंडावर मारहाण केली. सचिन जाधव याने लोखंडी पाईपने मारून व्यंकटराव रेड्डी यांचे डोके फोडले व आमच्या नादी लागाल तर खतम करून टाकू अशी धमकी देत सुरज जाधव व गणेश जाधव यांना ही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून निघून गेल्याची फिर्याद नेहा गंगाधर जाधव यांनी दिल्यावरून वरील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याचप्रकरणी सायकलचा धक्का लागल्याने तुझ्या शुभम या (child crime) मुलाने आशिष यास चापट का मारली म्हणून बबिता गंगाधर जाधव, नेहा गंगाधर जाधव, सुरज गंगाधर जाधव, गणेश गंगाधर जाधव, पुजा सुरज जाधव, अर्चना गोपाळ कांबळे, हरिभाऊ मुसळे, चमेली, छायाबाई दिपक जाधव, महेश डांगे, निखिल डांगे, मुक्ताबाई रेड्डी, कुणाल डांगे यांनी घरात येऊन शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी पाठीत, पोटात मारहाण केली. हरिभाऊ मुसळे याने डोक्यात विट मारून दुखापत केली. आई निलाबाई जाधव, वडील त्रिंबक जाधव भांडणं सोडविण्यासाठी आले असता त्यांना ही शिवीगाळ केली.
जिवे मारण्याची धमकी
नेहा जाधव हिने निलाबाई जाधव यांना नालीत ढकलून दिले. बबिता जाधव हिने काठीने उजव्या हातावर मारून दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद राधा विलास गायकवाड यांनी दिल्यावरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (child crime) लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेत दिनांक ३ मे रोजीच्य मध्यरात्री परस्परविरोधी दाखल झालेल्या दोन गुन्ह्यात दोन्ही गटातील एकूण पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास (Parbhani police) सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगनवाड हे करीत आहेत.