तक्रारदारावरच ठपका
जवळा बाजार/हिंगोली (Anganwadi Case) : येथील एका अंगणवाडीमध्ये पोषण आहारात अळ्या व किडे निघाल्या प्रकरणी एकात्मिक (Child Development Department) बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षकांकडून तपासणीचा शिष्टाचार पार पडला असून (Anganwadi Case) अंगणवाडीला क्लीन चीट देण्यात आली आहे.
शनिवारी अंगणवाडीतून (Anganwadi Case) पोषण आहाराचा खाऊ नेलेल्या तीन पालकांच्या डब्यामध्ये वाटाण्यामध्ये किडे व अळ्या असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी प्रसिद्ध झाल्यानंतर एकात्मिक बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षकांनी सदर अंगणवाडीला भेट दिली व धान्याची पाहणी केली असे समजते. यानंतर सदर धान्यामध्ये कुठलीही कीड नसल्याचे सर्टिफिकेट त्यांनी दिले.
याउलट तक्रारदारास तुमच्या डब्यात कीड आली कुठून हा असा उलट जाब विचारला. कुठल्याही धान्यामध्ये कीड असल्यास फक्त शिजवताना ती कीड बाहेर येते हे प्रमाणाद्वारे सिद्ध झाले आहे. मात्र (Anganwadi Case) अंगणवाडी मधील धान्यामध्ये कीड नसल्याचे तपासणी पथकाला आढळून आले आहे. दरम्यान धान्याची तपासणी करत असताना उपस्थितांनी अंगणवाडीचे धान्य काळ्या बाजारात जात असल्यास बाबत प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.