परभणीतील-जिंतूर-जालना महामार्गावर खडक पाटी जवळील घटना..!
जिंतूर (Vehicle Accident) : जालना महामार्गावरील खडक पाटी जवळील एका धाब्यासमोर जालना जिल्ह्यातील दहिफळ खंदारे येथील 34 वर्षीय युवक आपल्या बालकाला पाहाण्यासाठी जांब (बु) येथील भागू नाईक तांडा येथे येत असतांना त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि.29) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोराची धडक दिली होती. दरम्यान (Vehicle Accident) अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाचे परभणी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.
जालना जिल्ह्यातील दहिफळ खंदारे ता.मंठा येथील 34 वर्षीय यमराज साहेबराव चव्हाण यास मुलगी झाल्याने तो (Vehicle Accident) दुचाकीवरून जिंतूर तालुक्यातील जांब (बु) येथील भागू नाईक तांडा येथे सासरवाडीत मुलगी पाहण्यासाठी येत होता. परंतु जिंतूर – जालना मागमार्गावरील खडक पाटी जवळील एका धाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिली आणि अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.
अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत यमराज चव्हाणला स्थानिक नागरिकांनी तात्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी परभणी येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला झाला आहे. मयत दुचाकीस्वाराच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक नवजात मुलगी आहे. (Vehicle Accident) अपघातानंतर संबंधित वाहन चालक फरार झाला आहे.दरम्यान घटनास्थळी चारठाणा पोलीसांनी भेट दिली असून परभणी येथील रुग्णालयातून एमएलसी आल्यानंतर सदर प्रकरणी गुन्हा दाखल होईल.