परभणी/जिंतूर (child marriage) : तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Anchal Goyal) यांनी जिल्ह्यात बालविवाह (child marriage) प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी केली होती. अशावेळी जिंतूर तालुक्यासह जिल्हाभरात अनेक ठिकाणी कार्यवाही करण्यात आल्या. मात्र सध्या निवडणुकीच्या धामधुमीत बालविवाह प्रतिबंधक चळवळ थंडावली असल्याचे दिसून येत असून, ग्रामीण भागात सर्रास बालविवाह उरकण्यात येत आहेत.
जिल्ह्यात बालविवाह चळवळ थंडावली
संपूर्ण राज्यात बालविवाह प्रतिबंधक (child marriage) कायदा पारित करण्यात आला होता. यामध्ये मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष असल्यास विवाह योग्य वय मानले जाते कारण कमी वयात लग्न केल्यामुळे लैगिंक विकास होत नसल्यामुळे होणारे अपत्य कमजोर जन्माला येत असते. यामुळे मोठा परिणाम बालकाच्या आरोग्यावर होत असतो. म्हणून बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या उदासीन धोरणामुळे कायद्याची कडक अमलबजावणी होताना दिसत नाही.
यामुळे बालविवाहाचे प्रमाण कमी
परंतु परभणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Anchal Goyal) यांनी यांनी जिल्हाभरात (child marriage) बालविवाह रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली. यामुळे जिंतूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शेकडो बालविवाह रोखले गेले. शिवाय काही ठिकाणी बालविवाह झाले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे पालकांवर मोठी वचक निर्माण झाली होती. यामुळे बालविवाहाचे प्रमाण कमी झाले होते.
निवडणुकीच्या धामधुमीत अधिकारी कर्मचारी व्यस्त
परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Anchal Goyal) यांची बदली होताच, पुन्हा बालविवाहाचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून परभणी जिल्हयात (child marriage) बालविवाह प्रतिबंधक चळवळ थंडावल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अधिकारी कर्मचारी व्यस्त असताना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात (Child marriage ban) बालविवाह लावण्यात आली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे