अचानक पोलीस लग्न मंडपात दाखल झाल्याने उडाला गोंधळ!
औंढा नागनाथ (Child Marriage) : औंढा नागनाथ तालुक्यातील गवळेवाडी येथे दिनांक 9 मे शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास प्रशासनाला (Administration) मिळालेल्या गुप्त माहितीवरून चार बाल विवाह (Child Marriage) रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. अचानक पोलीस व महसूल कर्मचारी (Revenue Officer) लग्न मंडपात आल्याने वऱ्हाडी मंडळी अचंबित झाली. यानंतर, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष वधू-वराच्या वयाची पडताळणी करून कायदेशीर वय पूर्ण नसलेल्या चार वधू-वरांचे लग्नविधी थांबविण्यात आले. यावेळी निरीक्षक जीएस राहिरे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव,पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, जमादार बंडू घुगे, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय हिंगोली चे राजरत्न पाईकराव, समन्वयक अंकुश पाटोडे, तलाठी ज्योती स्वामी, ग्रामसेवक (Gram Sevak) जीपी हलबुर्गे सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती अचानक झालेल्या कारवाईने (Action) मात्र काही काळ लग्न घरी गोंधळ उडाला.