एसएमबीटीचा उपक्रम : रवींद्र विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याचे धडे
नाशिक (Dr. Sudhir Tambe) : कमी वयात वाढलेले आजार, निरोगी आरोग्याची बिघडलेली साखळी सुधारण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. कुठल्याही घरात लहान मुलांवर जे संस्कार होतील तिथून ती पिढी कशी असेल याचा अंदाज लावता येणे शक्य होईल. म्हणूनच लहान मुलं हीच निरोगी आरोग्याचे ‘ब्रॅण्ड अम्बेसिडर’ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार आणि प्रख्यात डॉक्टर सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी काढले. ते नाशिकमधील रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व रवींद्रनाथ विद्यालयात एसएमबीटी मेडिकल कॉलेज आयोजित ‘कॅच देम यंग’ या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. मनोज पिंगळे, एसएमबीटीच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, मनुजा पिंगळे, कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, माजी नगरसेवक राहुल दिवे यांची उपस्थिती होती.
शालेय जीवनात असताना विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टींची सवय व्हावी, त्यांना विविध आजारांबाबत जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने एसएमबीटीतर्फे ‘कॅच देम यंग’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत १०० विविध शाळांमध्ये एसएमबीटीचे प्राध्यापक विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. ‘कॅच देम यंग’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, व्यसनांपासून ते दूर राहावेत व त्यांच्या माध्यमातून घराघरांत वाढलेली व्यसनाधीनता व असंतुलित आहार यावर जनजागृती व्हावी म्हणून डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
डॉ. तांबे (Dr. Sudhir Tambe) म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे जपावे, विविध आजारांची लक्षणे कशी ओळखावीत व त्यावर काय प्राथमिक उपचार करावेत, कुटुंबाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावे, कोणते पदार्थ हितकारक व कोणते अपायकारक ठरतात हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. लहान मुलांसह मोठ्यांमध्ये संसर्गजन्य आणि असंर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. येणाऱ्या काळात यावर ठोस उपाय काढणे मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर असणार आहे. मनुष्य आजारी पडल्यानंतर डॉक्टर सांगतील तसे पथ्य पाळतो आणि बरा होतो. पुढील काही दिवसांनी आरोग्याची काळजी न घेतल्याने पुन्हा तो आजारी पडतो. जर मनुष्य आजारी पडलाच नाही तर उपचार घेण्याची गरज राहणार नाही परिणामी आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंददायी होईल म्हणूनच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी अॅड मनोज पिंगळे यांनी या उपक्रमाची सुरुवात आपल्या संस्थेतून झाल्याबद्दल आभार मानले. तसेच एसएमबीटीच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी संस्थेच्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमात विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून सविस्तर दोन तासांचा वर्ग घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकादेखील वितरित करण्यात आल्या. दर आठवड्याला एक दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना घरून काही अभ्यास करून येण्यासाठी सांगण्यात आले होते या लघु प्रकल्पांचे प्रदर्शनदेखील भरवण्यात आले. या प्रदर्शनात उत्कृष्ट प्रकल्पांना विशेष बक्षीसे देण्यात आली. या प्रकल्पांच्या परीक्षणाचे कार्य डॉ. सुप्रिया जोशी आणि मनुजा पिंगळे यांच्या पुढाकाराने पार पडले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसएमबीटीच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ मानसी पाध्ये गुर्जर, डॉ. प्रेरणा गोसावी, बालरोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती भुतडा, डॉ. नीलम, यांच्यासहसचिव वासंती गटणे, संचालिका मृणाल पाठक रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी निकम, आणि रवींद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील पर्यवेक्षक राजेश मालवी हे प्रयत्नशील होते.
भारताइतके तरुण कुठल्याही देशात नाहीत. तरुण पिढी आजारी पडली तर देशाचे भविष्य धोक्यात आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक ताण-तणावापासून दूर राहणे, मनाची एकाग्रता वाढवणे आणि नियमित योगा करणे आवश्यक आहे. शरीराला मनाशी जोडणे म्हणजे योग होय म्हणूनच योगाचे निरोगी जीवनात महत्वाचे स्थान आहे. वाढलेले साथीचे आजार, आरोग्यविषयी जनजागृती घडली पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे
– डॉ. सुधीर तांबे, माजी विधानपरिषद सदस्य
एसएमबीटी हॉस्पिटलची सेवा
एसएमबीटी हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार आणि रविवारी जन्मजात हृदय विकार असलेल्या लहान मुलांवर मोफत उपचार केले जातात. तसेच स्त्रीरोग विभागात मोफत गर्भसंस्कारासह सिझरियन तसेच नॉर्मल डिलिव्हरी मोफत केले जाते. तसेच लहान बालकांसाठी सुसज्ज अतिदक्षता विभाग याठिकाणी कार्यरत आहे. दरवर्षी शाळा दत्तक घेऊन या बालकांची नियमित तपासणी देखील याठिकाणी मोफत केली जाते.