गडचिरोली (Children Death) : दोन आजारी मुलांना ताप आल्याने डॉक्टरऐवजी मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने जडी बुटी देताच अहेरी तालुक्यातील येरागुडा येथील रमेश वेलादी यांचा सहा वर्षाचा मुलगा बाजीराव व साडेतीन वर्षाचा दिनेश दोन्हीही मुले (Children Death) दगावली. अंत्यवस्थ झालेल्या अवस्थेत (Jimalgatta Hospital) जिमलगट्टा येथील प्राथमिक उपकेंद्रात या दोन चिमुकल्यांना आणण्यात आले मात्र दोघांना मृत घोषित करण्यात आले.
अहेरी तालुक्याील पत्तीगाव हे त्यांचे आजोळ या परिसरातील एका मांत्रिकाने त्यांच्यावर उपचार केले होते. मात्र अंधश्रध्देचे भूत मानगुटीवर बसलेल्या या कुटुंबीयांनी आपले दोन्ही लेकरे गमावली. जिमलगट्टा रुग्णालयात (Jimalgatta Hospital) शववहिका उपलब्ध नसल्यामुळे मृत मुलांच्या आईवडिलांनी 15 किलोमिटरचे पत्तीगाव पर्यंतचे अंतर मृत मुलांना खांद्यावर घेऊन गाठले. आपल्या जन्मदात्या मुलांचे मृतदेह खांद्यावर नेताना त्यांची अवस्था काय असेल याची कल्पनाही करवत नाही. अपुऱ्या आरोग्यव्यवस्थेमुळेही उपचाराची आदिवासीं दूर्गम भागात बऱ्याच समस्या आहेत. जिवंतपणी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेकांना जीव गमावावा लागल्याची उदाहरणे आहेत. मात्र (Children Death) मृत्यूनंतरही मरणयात्राही नीट वाट्याला येत नाही ही या भागाची विदारक स्थिती.