ब्रिक्स मंचावर पहलगाम हल्ल्याचा निषेध
बीजिंग (China BRICS Parliamentry Forum) : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) निषेध करत बहुतेक देशांनी भारतासोबत एकता व्यक्त केली आहे. आता ब्रिक्स संसदीय मंचानेही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि कारवाई करण्याचा संकल्प केला आहे. पाकिस्तानसाठी हा आणखी एक धक्का आहे, कारण (China BRICS) चीनचाही ब्रिक्स मंचात समावेश आहे. चीननेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. चीन आणि भारताव्यतिरिक्त काही मुस्लिम देशांचाही ब्रिक्समध्ये समावेश आहे. (Operation Sindoor) ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला परदेशातही पाठिंबा मिळाला आहे.
चीनसह अनेक मुस्लिम देश भारताच्या समर्थनात
ब्रिक्स संसदीय मंचाने (China BRICS Parliamentry Forum) 22 एप्रिल 2025 रोजी भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये (Pahalgam Terror Attack) पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ब्राझिलिया, ब्राझील येथे झालेल्या 11 व्या ब्रिक्स (BRICS) संसदीय मंचात संयुक्त घोषणापत्र मंजूर करण्यात आले. भारत, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका, रशिया, इराण, युएई, इथिओपिया, इंडोनेशिया आणि इजिप्तसह १० सदस्य देशांनी ते स्वीकारले आहे. पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का आहे. कारण केवळ त्याचा जवळचा मित्र (China BRICS) चीनच नाही तर अनेक मुस्लिम देशांनीही भारतासोबत एकता व्यक्त केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या गटाने या शिखर परिषदेत भाग घेतला. भारताची बाजू मांडताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, ‘दहशतवाद ही आज फक्त भारताची समस्या नाही. ती एक जागतिक समस्या बनली आहे. (Pahalgam Terror Attack) दहशतवाद संपवण्यासाठी दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत थांबवण्याची, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक असली पाहिजे. तसेच, तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवला पाहिजे.’ बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व देशांनी बिर्ला यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आणि त्याचा समावेश घोषणेत करण्यात आला आहे.
चीनसह मुस्लिम देशांनीही पाकिस्तानला दिला धक्का
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायात आपले स्थान मजबूत करण्यासाठी चीनशिवाय मुस्लिम देशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान अनेकदा तुर्की, इराण, सौदी अरेबियासारख्या देशांसोबत एकता व्यक्त करतो. तथापि, (Pahalgam Terror Attack) पहलगाम हल्ल्यानंतर सौदी अरेबिया, युएईसह अनेक मुस्लिम देशांनी भारतासोबत शोक व्यक्त केला आहे. भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणांना उघड करण्यासाठी गंभीर राजनैतिक प्रयत्न करत आहे आणि त्यात त्याला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.