लोकांवर हल्ले सुरू केले, 2 ठार, 23 जखमी
China : चीनच्या दक्षिण-पश्चिम (Southwest) प्रांत युनान येथील रुग्णालयात (Hospital) चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात किमान 2 जणांचा मृत्यू झाला असून किमान 21 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी माध्यमांनी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने याला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलच्या आवारात चाकू हलवत असल्याचे दिसत आहे.
सरकारी माध्यमांच्या अधिकृत (Authorized) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झेंक्सिओंग काउंटीमधील स्थानिक रुग्णालयात हा हल्ला झाला. सीएनएनने गुइझौ टेलिव्हिजनचा हवाला देत वृत्त दिले आहे की, घटनास्थळावरील (Scene) अनेक व्हिडिओंमध्ये पोलिसांनी एका संशयिताला जवळच्या आरोग्य केंद्रात (Health center) अटक करताना दाखवले आहे. मात्र, अटक करण्यात आलेला संशयित हल्लेखोर होता की नाही याची पुष्टी हल्लेखोरांनी केली नाही.
अलीकडच्या काळात चीनमध्ये घटना वाढल्या
अलीकडच्या काळात चीनमध्ये (China) अशा घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात युनान प्रांतात (Province Yunnan) एका मानसिक त्रास झालेल्या व्यक्तीने लोकांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जण ठार तर सात जण जखमी झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण चीनमधील (Southern China) ग्वांगडोंग प्रांतातील बालवाडीत चाकूने हल्ला करून सहा जणांचा मृत्यू झाला होता तर एक जण जखमी झाला होता.
2020 मध्ये, दक्षिणेकडील गुआंग्शी प्रदेशातील (Guangxi region) एका प्राथमिक शाळेत (Elementary school) चाकू हल्ल्यात 37 मुले आणि दोन प्रौढ जखमी झाले, तर 2022 मध्ये, पूर्व जिआंग्शी प्रांतातील (East Jiangxi province) एका बालवाडीत चाकूने हल्ला केला आणि तीन जण जखमी झाले.