बीजिंग (China Restaurant Fire) : आज मंगळवारी चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही माहिती चीनच्या सरकारी वाहिनीने दिली आहे. त्याचबरोबर या (China Restaurant Fire) अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
22 people dead and 3 injured after a #fire broke out at a restaurant near a resettlement housing complex in Liaoyang, #Liaoning Province. The investigation is ongoing. #China pic.twitter.com/AfFQ2zPS12
— Shanghai Daily (@shanghaidaily) April 29, 2025
रेस्टॉरंटमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12:25 वाजता हा (China Restaurant Fire) अपघात झाला. लिओनिंग प्रांतातील लिओयांग शहरातील निवासी भागात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली. आग लागली तेव्हा रेस्टॉरंटमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
शी जिनपिंग यांनी व्यक्त केला शोक
दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना (China Restaurant Fire) आगीचे कारण लवकरात लवकर तपासण्याचे आणि जखमींवर उपचार करण्याचे निर्देश दिले.
First images from the restaurant fire 🔥
22 people dead and 3 injured after a #fire broke out at a restaurant near a resettlement housing complex in Liaoyang, #Liaoning Province. The investigation is ongoing. #China #fire pic.twitter.com/WRelu9T8ov
— Nazlı Özdemir (@nazliiozdemr) April 29, 2025
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, (China Restaurant Fire) आग स्वयंपाकघरातून सुरू झाली. अहवालांनुसार, त्या काळात मोठ्या उघड्या चुलींवर लोखंडी भांड्यांमध्ये भांडी शिजवली जात होती. चीनमधील लोक हॉट पॉट नावाच्या लोकप्रिय पदार्थाचा आनंद घेतात. ज्यामध्ये मांस आणि भाज्या उघड्या आगीवर शिजवल्या जातात.