हिंगोली (Ganpati festival) : शहरातील गड्डेपीर गल्ली येथील श्री चिंतामणी गणपती तसेच गणेशोत्सव निमीत्ताने दिनांक 16 ते 17 सप्टेंबर रोजी हिंगोली शहरात दर्शनासाठी तसेच मोदक प्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर राज्यातुन मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने भाविक एकत्र येणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने रहदारीस अडथळा निर्माण होण्याची तसेच अपघात होण्याची किंवा कोणताही अनुचीत प्रकार घडण्याचे शक्यता नाकारता येत नाही. त्या करिता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणे करीता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 16 सप्टेंबर रोजीचे दुपारी 3 वाजे पासुन ते दि.17 सप्टेंबर रोजीचे रात्री 12 वाजे पर्यंत पुढील प्रमाणे वाहतुकीच्या नियमा संबंधाने अधिसुचना काढण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारचे वाहतुकी करीता बंद असलेले मार्ग, इंदीरा गांधी चौक ते अंबीका टॉकीज सर्व वाहने पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.
महात्मा गांधी चौक ते मसाणी पेठ चौक सर्व वाहने पुर्णपणे बंद राहणार. त्याचप्रमाणे महात्मा गांधी चौक ते खुराणा पेट्रोलपंप चौक सर्व वाहने पुर्णपणे बंद राहणार तसेच जुने नगर पालीका चौक ते अंबीका टॉकीज सर्व वाहने पुर्णपणे बंद राहणार. जुनी गोदावरी हॉटेल कॉर्नर ते महात्मा गांधी चौक सर्व वाहने पुर्णपणे बंद आहे.
वाहतुकी करीता पर्यायी मार्ग
जवळा पळसी रोडने येणारे वाहन खुशाल नगर, नवा मोढा, रेल्वे स्टेशन रोडने येतील व जातील. कळमनुरी तसेच औढा (ना) कडुन येणारे वाहन नांदेड नाका जिल्हा परीषद रोडने येतील व जातील. वाशिम कडुन येणारे वाहन छत्रपती शिवाजी महाराज चौक जिल्हा परीषद रोड नांदेड नाका मार्गे येतील जातील तरी उपरोक्त प्रमाणे 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजे पासुन ते 17 सप्टेंबर रात्रीचे 12 वाजे पावेतो वाहतुकिस अडथळा होवु नये तसेच कोणतेही अनुचीत प्रकार होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या करिता पर्यायी मार्गाची अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. वाहन चालकांनी या नियमाचे पालन करून वाहतूक चालवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.