गाय हाकलण्याच्या नादात घडली घटना
लाखनी (Chulband river flood) : तालुक्यातील पालांदूर जवळील पाथरी (Chulband river flood) चुलबंद नदीपात्रात दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता दरम्यान धक्कादायक घटना घडली. नदी पात्रातील पाळीव जनावरे हाकलण्याच्या नादात अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात पाथरी येथील ५८ वर्षीय व्यक्ती वाहून गेला. रूपदास रामा वलथरे असे पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाले उफाळून वाहत आहेत. संथतधार पावसामुळे सर्वत्र जनमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
संथतधार पावसामुळे वैनगंगा नदीसह चुलबंद (Chulband river flood), सुर, बावनथडी व इतर नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील पाथरी (लोहारा) येथील रूपदास वलथरे हा गावाजवळील चुलबंद नदीकडे फिरण्यास गेला होता. त्यावेळी नदीपात्रात काही गायी दिसून आल्या. त्यांना हाकलण्याच्या प्रयत्नात अचानक पुराचा लोंढा आल्याने रूपदास वलथरे हा पुरात वाहून गेला याची माहिती गावात व परिसरात होताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन मोठी गर्दी केली होती.
याची माहिती पालांदूर पोलिसांना (Palandur Police) व महसूल विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच पालांदूर ठाण्यातील पोलिसांचा पथक तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन Chulband river flood पुरात वाहून गेलेल्या रूपदास वलथरे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत लाखनी तहसिलदार निंबाळकर यांनी नदी काठावरील गावातील तलाठी, कोतवाल व पोलीस पाटील यांना याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळपर्यंत रूपदास वलथरे याचे प्रेत (Palandur Police) पोलिसांच्या हाती लागले नव्हते.