परभणी/मानवत (Parbhani):- देशोन्नती वृत्तसंकलन राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन: स्वास्थ केंद्र(health center), योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळी एक रकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत डीबीटी प्रणाली द्वारे थेट हस्तांतरण करण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना ३ हजार रुपये एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार
या योजनेअंतर्गत मानवत शहरातील सर्व ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आपापले अर्ज योग्य कागदपत्रासह नगरपरिषद कार्यालयामध्ये सादर करावेत. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना ३ हजार रुपये एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सदरील रक्कम ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र, ड्रायपोड स्टिक(Drypod stick), व्हील चेअर(Wheel chair), फोल्डिंग वॉकर(folding walker), कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर, इत्यादी सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी उपयोगात येणार आहेत. तरी मानवत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा १०० % लाभ घ्यावा. मुख्यमंत्री वयोश्री योजना (Chief Minister Vyoshree Yojana) करिता आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत.