हेरीटेज फुड्स लि.च्या ५ हजार १४० लिटर मधील घेतले दुधाचे नमुने
परभणी (Milk adulteration) : दुधातील भेसळ रोखण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने धडक तपासणी मोहिम राबवत सोमवार २९ जुलै रोजी पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील दुध संकलन केंद्रातील दुधाचे नमूने तपासणीसाठी घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. ही धडक मोहिम तपासणी समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे (Dr. Pratap Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे निर्देशित केल्यानुसार परभणी जिल्ह्यात दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर समितीने सोमवार २९ जुलै रोजी सकाळी पूर्णा तालुक्या-तील ताडकळस येथील हेरिटेज फुड्स लि.या दुध संकलन केंद्रास अचानक भेट दिली व त्यावेळी ५ हजार १४० लिटर संकलित (Milk adulteration) दुधातील काही नमुने तपासणी साठी घेण्यात आले असून ते शासकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येत आहेत. सदर धडक तपासणी मोहिम अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे (Dr. Pratap Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिनगिने, अन्न सुरक्षा अधिकारी तम्मडवार, दुध संकलन पर्यवेक्षक गुंडरे, इचनर यांच्या पथकाने केली आहे.
दुध भेसळीच्या नागरीकांनी द्या तक्रार- डॉ. प्रताप काळे
नागरीकांनी आगामी सणासुदीच्या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ (Milk adulteration) होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याची तक्रार तात्काळ प्रशासनाकडे करावी. तसेच टोल प्रâी क्रमांक ७०२८९७५००१ व ९०४९५१८७-११ या क्रमांकांवर भेसळीच्या अनुषंगाने असलेली माहिती द्यावी.
– डॉ. प्रताप काळे, अप्पर जिल्हाधिकारी परभणी.