Gadchiroli :- जिल्ह्यात दिनांक २८ जूलै ते ०३ ऑगस्ट दरम्यान नक्षल्याकडून राबविल्या जाणार्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात नक्षलवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. या अंतर्गत जिमलगट्टा उपविभागातील दामरंचा उपपोलीस ठाण्याच्या हद्दितील नागरीकांनी ०३ भरमार बंदूका व ०१ बंदुकीचे (gun) बॅरेल पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
नक्षल सप्ताहादरम्यान पोलीस दलाच्या आवाहनास दामरंचा हद्दितील नागरीकांचा प्रतिसाद
दुर्गम भागातील नागरीक शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बंदूका बाळगत असत. अशा प्रकारच्या वडीलोर्जीत बंदूका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. या बाबीचा फायदा घेऊन नक्षली सर्वसामान्य जनतेला नक्षली चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे पोलीस विभागाने नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदूका स्वेच्छेने गडचिरोली पोलीस(Gadchiroli police)दलाकडे स्वाधिन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अंतर्गत दामरंचा उपपोलीस ठाण्याच्या हद्दितील नागरिकांनी ०३ नग बंदूका व ०१ नग बंदुकीचे बॅरेल गडचिरोली पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.