अकोला (MLA Randhir Savarkar) : ग्रामीण भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये, यासाठी संबंधित संस्थांनी समन्वयातून तोडगा काढावा, अशा सूचना भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद (MLA Randhir Savarkar) आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटीसमध्ये ९८७.७९ लक्ष रूपये थकबाकी जमा करावी, अन्यथा काटेपूर्णा, वान प्रकल्पामधून होणारा ६० खेडी, ४ खेडी तसेच ८४ खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा १५ फेब्रुवारीपासून बंद करण्यात येईल असे कळविले आहे. जिल्हा परिषदेकडून थकबाकी अदा न केल्यामुळे ग्रामीण भागातील प्रामुख्याने खारपाणपट्ट्यातील पिण्याचा पाणीपुरवठा बंद झाल्यास जनजीवन विस्कळीत होईल. त्यामुळे समन्वय साधून ग्रामीण पाणीपुरवठा बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे (MLA Randhir Savarkar) आमदार रणधीर सावरकरांनी दोन्ही विभागांना बजावले आहे.
मु.का.अ. यांनी पाटबंधारे विभागासोबत तातडीने संपर्क साधून पाटबंधारे खात्याची थकबाकी अदा करण्याचा प्रश्न निकाली काढावा. याबाबत शाश्वती देऊन अथवा थकबाकी अदा करावी. कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा बंद करू नये, असे पाटबंधारे खात्यास कळविण्यात आले आहे.