परभणी(Parbhani) :- जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीच्या वेळी भगरीमधून झालेल्या विषबाधेच्या (poisoning) घटनेमुळे या महिन्यात असलेल्या आषाढी एकादशी निमित्तामुळे अन्न व औषध प्रशासन(Drug Administration) सहाय्यक आयुक्त अनंत चौधरी यांनी नागरीकांना भगरीबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
वातावरणातील बदलामुळे किराणा दुकानांमध्ये एकाच ठिकाणी साठवलेल्या भगरीला बुरशी (fungus) लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरीकांनी खुली भगर न घेता सिलबंद असलेल्या पिवशीमधील भगर वापरावी व ती खरेदी करतांना त्यावरील मुदतीची तपासणी(Inspection) करावी. मोठया कार्यक्रमात नागरीकांकरीता मोठ्या भांडयांमध्ये ज्यावेळी भगर शिजवीली जाते त्यावेळी मुख्यत: ती व्यवस्थितपणे धुणे व पुर्णपणे शिजवणे अपेक्षीत असते. भगर बनल्यानंतर ताजी-ताजी एक ते दोन तासांमध्ये खाणे अपेक्षीत आहे. ज्यामुळे भगरीला असलेली घाण निघून शिजविण्यामध्ये पूर्णपणे निघून जाते. ताजे खाल्ल्यामुळे भगरीमध्ये कुठलीही प्रक्रीया होत नाही. भगरीचे पीठ बनवून महिला त्या बरेच दिवस साठवून ठेवतांना दिसतात. परंतू ते तसे न करता जेंव्हाच्या तेंव्हा संपवावे. भगरीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रक्रिया घडणार नाही.