शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करावा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रतिपादन
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (MP Amar Kale) : बदलापूर दुर्घटना अत्यंत दुर्दैव आहे. अश्या घटना महाराष्ट्रात घडू नये, यासाठी मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा आणला आणि त्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. पण तो केंद्रात अद्याप पारित झाला नाही त्यासाठी मी सतत पाठपुरवा करत आहे. असे प्रतिपादन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले. नागरी सत्कार समिती, वर्धा जिल्हा व्यापारी संघटना व विविध सामाजिक संघटनेच्यातर्फे नवनियुक्त खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश देशमुख, डॉ. विभा गुप्ता, सुरेश जयस्वाल, परमानंद तापडिया, शालिग्राम तिबडेवाल, श्रीकांत राठी, संयोजक डॉ. अभ्युदय मेघे उपस्थित होते.
यावेळी खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना मी लवकरात लवकर वर्धा शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहे. या माध्यमातुन नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच वर्धा शहरातील व्यापारी संघटनाशी बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन. जीएसटी सारखा विषय लोकसभेत मांडणार असल्याचे वचन देखील त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ. अभ्युदय मेघे यांनी केले. अध्यक्षस्थानी सुरेश देशमुख यांनी नवनिर्वाचित खासदारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांचे संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले. आभार नौशाद बैक्ष यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशवीतेकरीता वर्धा सोशल फोरम, सिंधी समाज असो., सेवा समिती असो., भारतीय माजी सैनिक संघटना, गांधी जिल्हा फोटोग्राफर असो, लायन्स क्लब गांधी सिटी, विदर्भ कॉलेजटीचर असो, जवान डिफेन्स अँड स्पोर्टस् करिअर अकॅडमी, वर्धा मंडप साउंड सिस्टम, जय हिंद फाऊंडेशन, वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षण संघटना, क्रेडिया बिल्डर असो, लॉइन्स क्लब वर्धा, जनहित मंच, गुड मॉर्निंग ग्रुप, आधारवड ज्येष्ठ नागरीक, निसर्ग सेवा समिती, महेश्वरी मंडल वर्धा, स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, बॅचलर रोड मार्केट असो., वीर बजरंगी ग्रूप बागेर्श्वर धाम सेवा समिती, वर्धा व्यापारी संघ, माळी समाज संघटना, साप्ताहिक वर्धा की आवाज, टाईल्स अँड स्टील असो, हार्डवेअर असो., कामगार संघटना संयुक्त कृती समिती, कोचिंग क्लासेस असोसिएशन, श्री संत भिकाजी महाराज फाऊंडेशन वर्धा, सिमरन बहुउद्देशिय संस्था यांनी सहकार्य केले.
वर्धा शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू करणार
वर्धा शहरात जनसंपर्क कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाईल. तसेच वर्धा शहरातील व्यापारी संघटनांची बैठक घेऊन त्यांच्या विविण समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. व जीएसटी सारखा विषय लोकसभेत मांडणार असल्याचे वचन खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांनी सांगितले.