मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल
मोहाडी (Mohadi Police Crime) : मोहाडी येथील शिवाजी चौकातील जामा मश्जिदीजवळील सिराज मोबाईल दुकानासमोर दोन गटांमध्ये वाद होऊन झालेल्या मारहाणीत एका तरुणावर लोखंडी पेन्चीसने हल्ला झाल्याची घटना मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, रेहान असलम शेख रा. टिळक वार्ड, मोहाडी हे एअरटेल सीम पोर्टसाठी सिराज मोबाइल दुकानात गेले असता, आरोपी नईम मोहम्मद कुरेशी (५०) रा. टिळक वार्ड, मोहाडी याने दुकानासमोर येऊन दुकानदार सिराज शेख यांना शिवीगाळ केली. यावर रेहान याने विरोध केला असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून (Mohadi Police Crime) जीव घेण्याची धमकी दिली. यानंतर आरोपी नईमने दुकानात घुसून फिर्यादीच्या मानेवर हाताने प्रहार केला. रेहानने ढकलले असता आरोपी नईमने बाहेरून लोखंडी पेन्चीस आणून कपाळावर वार केला.
या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कपाळातून रक्तस्त्राव सुरू होता. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत. तर दुसर्या गटाकडूनही तक्रार केल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. या दरम्यान, (Mohadi Police Crime) मोहाडी येथे मुस्लीम समाजातील दोन गटांमध्ये पूर्वीपासून वाद होत असून यापूर्वीही अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून कोणत्याही वेळी गटांमध्ये मारामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहून सतर्क राहणे आवश्यक आहे.
