हिंगोली (Sengaon Crime) : सेनगाव येथे डूकरे नेण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणात पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये एकास खंजरने भोसकल्याने तो गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका गटाच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ११ फेब्रुवारीला सकाळी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Sengaon Crime) सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या बाजूला डूकरे नेण्याच्या कारणावरून सोमवारी ता. १० सायंकाळी दोन गटात वाद निर्माण झाला होता. यामध्ये शाब्दीक चकमकीनंतर हाणामारीला सुरवात झाल्याने दोन्ही गटाकडील गावकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे हाणामारी अन गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शालीनी नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, उपनिरीक्षक एस. बी. स्वामी, जमादार सुभाष चव्हाण, जाधव यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.या मारहाणीत मणजित सुरकेटाक यांना (Sengaon Crime) खंजरने मारहाण झाली असून त्यांच्या पोटावर व शरिराच्या डाव्या बाजूला वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या सोबकतच अजयसिंग हा देखील जखमी झाला आहे. तर दुसर्या गटातील दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणातील काही जखमी खाजगी रुग्णालयात तर दोघांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या (Sengaon Crime) प्रकरणी मणजित सुरकेटाक यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी यशवंत उर्प बालाजी पवार (रा. रिसोड), भारत काळे, शिवाजी काळे (रा. हिंगोली) यांच्या विरुध्द मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक स्वामी पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात दुसर्या गटाचा जवाब नोंदविण्यात आला असून रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.