शेतकरी बांधवाप्रती संवेदनशीलता!
रिसोड (CM Aid Fund) : भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल देशमुख (Nakul Deshmukh) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत २ लक्ष रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
जन्मदिवस साजरा न करण्याची केली होती आवाहन, स्नेहजणांकडून उत्तम प्रतिसाद!
महाराष्ट्रातील अतिवृष्टी (Heavy Rain) आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधव हा अतिशय अडचणीत सापडला असून राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे आहे याच अनुषंगाने भाजपचे नेते नकुल देशमुख यांनी त्यांचा ९ ऑक्टोबर रोजी होणारा वाढदिवस टाळत त्याच्या सर्व स्नेहीजनांना मित्र परिवारास आणि कार्यकर्त्यांना जन्मदिवस साजरा न करता त्यावर होणारा खर्च शेतकरी बांधवांप्रती बांधवांसाठी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचे आवाहन केले होते. नकुल देशमुख यांनी मित्रपरिवार, स्नेही,हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना केलेल्या आवहानास प्रतिसाद दिला.
मान्यवर मंडळी उपस्थित!
अमरावती येथे २ लाख रुपये इतकी मदत “मुख्यमंत्री सहायता निधी” करिता मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या कडे नकुल देशमुख यांनी सुपूर्द केली. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भाजप रप्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी मंत्री माजी खासदार अनंतरावजी देशमुख साहेब,भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस मा.रणधीरजी सावरकर साहेब, खासदार अनुपजी धोत्रे, सोबत भाजपा जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, रिसोड ग्रामीणचे अध्यक्ष सुभाषराव खरात, गोवर्धन मंडळाचे अध्यक्ष अमोल पाटील भुतेकर, रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, कृष्णा आसनकर, पंचायत समिती सदस्य भूषण पाटील, पंचायत समिती सदस्य संदीप धांडे सहित मान्यवर मंडळी उपस्थित होती.
नकुल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक आणि शुभेच्छा!
शेतकऱ्यांप्रती (Farmers) संवेदनशीलता जपत वाढदिवस साजरा न करता मित्र परिवाराला आव्हान करून व्यर्थ खर्च टाळत तो खर्च मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देण्याचे आवहान करत २ लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल देशमुख यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.