नवी दिल्ली (Arvind Kejriwal) : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) संपल्या आहेत. आज मतदानाचे सर्व सात टप्पे संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीवाल परत तिहार तुरुंगात जात आहेत. त्यांचा अंतरिम जामीन आज संपला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी असून, त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले. निवडणूक प्रचारासाठी (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी, आज त्यांना शरण जावे लागणार आहे.
सीएम केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जामीन एक आठवडा वाढवण्यासाठी दिल्ली कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्ट त्यावर 5 जूनला सुनावणी करणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना आज पुन्हा तुरुंगात जावे लागत आहे. केजरीवाल यांनी 2 जून रोजी दुपारी 3 वाजता आत्मसमर्पण करणार असल्याची घोषणा केली होती. (Lok Sabha elections) निवडणुकीनंतर मी 2 जूनला आत्मसमर्पण करेन, असे ते म्हणाले होते. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात लढत आहोत, देशासाठी मला प्राणाची आहुती द्यावी लागली तर शोक करू नका, असे ते म्हणाले.
#WATCH | Delhi Minister Atishi says "We want to thank the Supreme Court for granting Arvind Kejriwal a bail for 21 days. In these 21 days, he campaigned for the INDIA alliance and today, respecting the judiciary, Arvind Kejriwal has surrendered on the scheduled date. He is not… pic.twitter.com/2LOxC4GeDY
— ANI (@ANI) June 2, 2024
ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केली होती. दिल्ली दारू घोटाळ्यात (Liquor scams Case) केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिका आहे. दारूच्या परवान्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. ‘आप’ने 100 कोटी रुपये घेतल्याचा ईडीचा दावा आहे. जो गोवा आणि पंजाबच्या निवडणुकीत वापरला गेला. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
या प्रकरणातील संपूर्ण कारवाई राजकीय सूडबुद्धीची कृती असल्याचे म्हटले आहे. मी प्रचार करू शकत नाही म्हणून, हे सर्व केले जात असल्याचे केजरीवाल म्हणाले. (Arvind Kejriwal) केजरीवाल यांना प्रचार करता यावा म्हणून, (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी अनेक रॅली आणि रोड शो केले. 4 जून रोजी (Lok Sabha elections) निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.