डांगरे परिवार भारावला
नागपूर (Dr. Vilas Dangre) : पद्मश्री बहुमानाने सन्मानित डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांच्या तपोवन येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात वेळ काढून सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
होमिओपॅथिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णांना त्यांनी योग्य औषधोपचारासह नवा विश्वास दिला. होमिओपॅथी चिकित्साबाबत (Dr. Vilas Dangre) त्यांना पद्मश्री बहाल झाल्याने या चिकित्सेचा सन्मान झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गोरगरिबांना योग्य उपचारासह विश्वासही मिळाला पाहिजे. हा विश्वास देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न आजवर करत आलो. यापुढेही करत राहीन असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्वत:हून घरी भेट देऊन दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्ही भारावून गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.