मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार
मुंबई (CM Devendra Fadnavis) : विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या (Gondia-Balharshah railway) रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 4819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे. जियो कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री (Ashwini Vaishnav) अश्विनी वैष्णव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी (Gondia-Balharshah railway) विक्रमी निधी देण्यात आला असून याद्वारे 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी एकूण 1.73 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यावर्षी रेल्वे बजेटमधून महाराष्ट्राला 23,700 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले..
रेल्वे मंत्रालयाच्या (Gondia-Balharshah railway) माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला 10 दिवसांचा टूर आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार आहे, असे (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांनी सांगितले.