देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा बोलबाला…भविष्यात महाराष्ट्र बनणार डेटा सेंटरचे कॅपिटल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईदेशमहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा बोलबाला…भविष्यात महाराष्ट्र बनणार डेटा सेंटरचे कॅपिटल

Digital Nagpur
Last updated: 2025/01/24 at 3:28 PM
By Digital Nagpur Published January 24, 2025
Share
CM Devendra Fadnavis

दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

मुंबई (CM Devendra Fadnavis) : दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या (World Economic Forum) भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. तसेच दावोस मधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोस मध्ये गुंतवणूकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सारांश
दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवादविक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मितीदावोस वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच का..?कृत्रिम बुद्धिमत्ता –एआय, आणि माहिती तंत्रज्ञानपर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासविक्रमी गुंतवणूकीसाठी टीमचेही कौतूकदावोस मध्ये आज दृष्टिक्षेपात…

विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती

महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल (Data center capital) होईल. डेटा हे नव्या युगाचे ‘ऑईल’ आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकारांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) मुंबई येथून सहभागी झाले.

सुरवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन केले. तसेच दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमीक फोरममध्ये देशातील अन्य सहा राज्यांसमवेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे आभार मानले. दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘कंट्री डायलॉग’ या सत्रात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणांचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (CM Revanth Reddy) यांच्या समवेत सहभाग घेतल्याचे सांगून फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, यात आम्ही आपआपल्या राज्यांची शक्तीस्थळांची, वेगवेगळ्या राज्यांच्या विकास संकल्पनांची, गुंतवणूकसाठीची संधी याबाबतची माहिती दिली. एक भारत म्हणून सहा राज्यांनी भूमिका मांडत देशात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले. एका आवाजात एक भारत म्हणून भूमिका मांडली, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devendra Fadnavis (@devendra_fadnavis)

‘जल सुरक्षित भविष्यासाठी जागतिक सहकार्य’ विषयांमध्ये देश आणि राज्याची भूमिका मांडली. जलयुक्त शिवारसोबतच जलसंधारणाच्या काय उपाययोजना राज्यात केल्या जात आहेत याचे सादरीकरण करता आले. आपापल्या राज्याची ताकद आम्ही येथे दाखवून देऊ शकलो. देशात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच भारत ‘अट्रॅक्टीव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन’ असल्याचे जगाला पटवून देण्यात यश आल्याचेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, महाराष्ट्रासाठी गुंतवणूकीचे असे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे देशात होणाऱ्या सामंजस्य करारांचे यश हे चाळीस टक्क्यांपर्यंत असते. पण हेच प्रमाण महाराष्ट्राच्याबाबतीत सुमारे ६५ टक्के आहे.

गतवर्षी दावोस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या काळात चांगली सुरवात झाली होती. त्यावेळी झालेल्या करारांची ९५ टक्क्यांपर्यंत अमंलबजावणी झाली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत याही वर्षी विविध क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. त्यातही एमएमआर हे मॅग्नेट समजले जाते. एमएमआरमध्ये सहा लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. याशिवाय विदर्भ पाच लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र ३० हजार कोटी तर मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरींग हब हे शक्तीस्थळ ठरू लागले आहे. ही सगळी गुंतवणूक थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी संस्थात्मक गुंतवणूक असते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही विस्तारीत होते.

दावोस वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच का..?

दावोसमध्ये करार झालेले अनेक उद्योग भारतीयच आहेत तर दावोसमध्येच करार का अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. दावोसमध्ये जगभरातील सीईओ येतात. आपल्या कित्येक कंपन्या भारतीय असल्या तरी त्या आता वैश्विक झाल्या आहेत. या कंपन्यांचे विदेशी गुंतवणूकदार- भागिदारांशीही यानिमित्ताने चर्चा करण्यात आली. दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्कींगचे केंद्र आहे. भारतीय कंपन्यांना करार करताना त्यांचे विदेशी गुंतवणुकदार सोबत असावेत असे वाटणे गैर नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक होणारी ९५ टक्के गुंतवणूक विदेशी आहे. कराराचे रूपांतर प्रत्यक्षात आणण्यात (Maharashtra) महाराष्ट्र अग्रेसर आहे. आतापर्यंत देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सुमारे ६५ ते सत्तर टक्के कराराचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक येण्यात झाली आहे. यावेळी सर्वच करार फलद्रुप करण्यावर आमचा भर आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता –एआय, आणि माहिती तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याच्यादृष्टीने अनेक करार दावोस मध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये गुगलशी करार करण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी निर्माण करून एक परिसंस्था उभी करण्यावर आपण भर दिला आहे. डेटा हे न्यू ऑईल आहे. तेल क्षेत्राप्रमाणेच यात वाढीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे डेटा सेंटर उभे करण्यावर आणि त्यामध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात आपल्याला यश आले आहे. एआय मध्ये महाराष्ट्राने सर्वात पहिले पाऊल टाकले आहे. गुगलशीही आपण याबाबत एक्सलन्स सेंटर स्थापन करण्याचा करार यापुर्वीच केला आहे. दावोस मध्ये ग्लोबल सीईओंशी चर्चा केल्याने या क्षेत्रातील रोजगार संधीची मोठी क्षमता लक्षात आली.

पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास

गुंतवणुकीचे करार आणि उद्योग आणताना पर्यावरणाचा आपण साकल्याने विचार केला आहे. विशेषतः हरित उर्जा, हायड्रो उर्जा, सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. स्वच्छ उर्जेतूनच आपल्याला पर्यावरण रक्षण करता येणार आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचे काम तसेच यातील गुंतवणूकीची माहिती आपण दिली. तसेच ऊर्जा क्षेत्रातील नवे प्रवाह – एनर्जी ट्रान्झिशन मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. २०२२ मधील १३ टक्क्यांवरून आता आपण २५ टक्के तर २०३० मध्ये ५० टक्क्यांपर्यंचे लक्ष्य गाठणार आहोत. महाराष्ट्र हे ईव्ही सेंटर असेल. त्यामुळे शाश्वत ऊर्जा क्षेत्राच्याबाबतीत आपण सौर ऊर्जेसह अनेक क्षेत्रात काम करत असल्याची मांडणी करता आली.

विक्रमी गुंतवणूकीसाठी टीमचेही कौतूक

दावोस दौऱ्यातून गुतंवतणूकीचे विक्रमी उद्दीष्ट् साध्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्यासह उद्योग विभाग, एमआयडीसी तसेच सल्लागार संस्था, त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांनी या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, विविध यंत्रणांशी चांगला समन्वय, संपर्क ठेवल्याने हे उद्दीष्ट साध्य करता आल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

दावोस मध्ये आज दृष्टिक्षेपात…

जपानच्या सुमिटोमी समुहाची राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रात ४३ हजार कोटींची गुंतवणूक. एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईतील पायाभूत सुविधा क्षेत्राच्या प्रगतीला चालना. जपान आणि महाराष्ट्राच्या दरम्यानच्या सौहार्द, सलोख्याचे उत्तम उदाहरण.  bn सुमिटोमी समुहाचे प्रेसिडेंट कोजून निशीमा सॅन यांचे नेहमीच महाराष्ट्र आणि मुंबईकरिता सहकार्य.

You Might Also Like

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!

TAGGED: ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, CM Revanth Reddy, Data center capital, eknath shinde, maharashtra, Maharashtra BJP CM, Maharashtra CM, Maharashtra Mahavikas Aghadi, Maharashtra New CM, MLA Ambadas Danve, NCP, pm modi, PM Narendra Modi, Shiv Sena, Uddhav Thackeray, World Economic Forum
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
AI Fashion
देशतंत्रज्ञानविदेश

AI Fashion Show: PM मोदींसोबत जागतिक नेते फॅशन शोमध्ये; एलोन मस्कने शेअर केलेला…बघा VIDEO

Digital Nagpur Digital Nagpur July 22, 2024
ShivSena Andolan: कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना उबाठा.चा जनआक्रोश..
Youth Murder: खुनातील आरोपींच्या 36 तासात हट्टा पोलिसांनी आवळल्या मुस्क्या!
Job Fraud: नोकरीच्या नावाखाली अनेकांना घातला गंडा!
Parbhani: शाँर्ट सर्कीटने कपड्याचे दुकान जळुन खाक; झाले इतक्या लाखांचे नुकसान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Parbhani Election Results
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?