ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांंजली
मुंबई (CM Devendra Fadnavis) : मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील, अशा प्रा. रा. रं. बोराडे (Senior Literary R. R. Burade) यांचे निधन या चळवळीची हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीणकथाकार प्रा. रा. रं बोराडे (Senior Literary R. R. Burade) यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. pic.twitter.com/GUU7B9Wwdx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 11, 2025
प्रा. बोराडे यांना जाहीर झालेला विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यापुर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला, हे दुख:द असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, ‘पाचोळाकार’ म्हणून लोकप्रियता मिळविणारे प्रा. बोराडे मराठीचे अध्यापन, साहित्य चळवळ अशा सर्वच ठिकाणी हिरीरीने पुढे राहीले. प्रा. बोराडे (Senior Literary R. R. Burade)यांनी आपल्या अस्सल ग्रामीण साहित्यकृतींनी साहित्यात मोलाची भर घातली.
देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भुषविले. अनेक साहित्यिक, नवोदितांसाठी ते मार्गदर्शक म्हणून आदरस्थानी होते. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळ आणि त्यातील विविध प्रवाहांना बळ दिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील समर्पित सेवायात्री हरपल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे. प्रा. बोराडे (Senior Literary R. R. Burade) यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, त्यांचे कुटुंबिय, चाहते यांच्या दु:खात सहभागी आहोत, असेही म्हटले आहे.