बुलढाणा (CM Eknath Shinde) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हा प्रचार दौर्यावर होते. त्यांचे देऊळगावराजा येथे आगमन झाले असता हेलिपॅडवर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसह त्यांचे स्वागत केले ते, चिमुकल्या वेदने!
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे देऊळगावराजा येथे केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्यासह हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत श्रीनिवास खेडेकर, जगदीश कापसे, विवेकराव खेडेकर या शिवसेना पदाधिकार्यांसह वेद संतोष शिंगणे या चिमुकल्याने केले. त्याचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी आदरपुर्वक स्विकारले.