हिंगोली (CM Eknath Shinde) : कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोली शहरातील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत उद्या १२ ऑगस्ट रोजी आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा (Kavad Yatra) काढली जाणार आहे. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची उपस्थिती राहणार आहे. कावड यात्रेनिमित्त शिवभक्तांचे मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे.
प्रत्येक वर्षी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली श्रावण मासातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा (Kavad Yatra) काढली जाते. या निमित्ताने आज १२ ऑगस्ट सोमवार रोजी कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव मंदिरातून कावड यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा हिंगोली शहरातील अमृतधारा महादेव मंदिरा पर्यंत येणार आहे. यात्रेनिमित्त ठिकठिकाणी शिवभक्तांकडून स्वागत केले जाणार आहे.
यात्रेतील सहभागी शिवभक्तांना टीशर्ट वाटप केले जाणार आहे. १ लाखाहून अधिक शिवभक्त यात्रेमध्ये सहभागी होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहे. यात्रे निमित्ताने आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांचे मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीकोणातून प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जागोजागी तैनात केले असून बंदोबस्ताची रंगीत तालीम देखील ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या हिंगोली दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३० वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करणार आहेत.