मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या, औक्षणामुळे मंगल वातावरण
मुंबई (CM Eknath Shinde) : आज रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) पावन पर्वावर राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी पोहचून, मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांचे औक्षण करून, राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा निवासस्थानी मंगल आणि रक्षाबंधनाचे आगळे उत्साही वातावरण होते. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहे. या (CM Ladki Bahin Yojana) संकल्पाची सुरवात आज वर्षा निवासस्थानी झाली.
माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल. ही केवळ (Raksha Bandhan) रक्षाबंधनाची ओवाळणी नाही, तर माहेरचा कायमचा आहेर आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे (CM Ladki Bahin Yojana) दोन हप्ते रक्षाबंधनापुर्वी माझ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावेत, असा आमचा प्रय़त्न होता, तो शब्द आम्ही पाळला. राज्यातील 1 कोटी 4 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. अन्य महिलांच्या खात्यातही हळू हळू आधार सिंडींग आणि तांत्रिक बाबी पूर्ण होताच, पैसे जमा होतील. यातून माझ्या बहिणींच्या संसाराला थोडाफार आर्थिक हातभार लागेल, ही आमची भावना आहे, ”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे रक्षाबंधन
उमेद अभियानामार्फत राज्यात 84 लाख महिला बचतगटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. या सगळ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देत आहेत. तुमच्या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ मिळावी, असे आमचे प्रयत्न आहेत. मोठमोठ्या मॉलमध्ये, अमेझॉन, फ्लिपकार्ट या प्लटफॉर्मवरही आपली उत्पादने विकली जावीत, यासाठी आमचे प्रय़त्न सुरु आहेत. बसस्थानकावर आपल्या स्टॉल्स जागा मिळावेत, असे निर्देश दिलेच आहेत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबाबत केंद्रांशी संपर्क साधून आहोत. उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या चळवळीला बळकट करण्यासाठी विशेष बैठक बोलावून उपायोयनजा करण्यात येतील, असे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्यावेळी महिलांसाठी, मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या (CM Ladki Bahin Yojana) अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी, लखपती दिदी या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित भगिनींनी औक्षण करून, मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या. वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांना राख्या (Raksha Bandhan) बांधल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीही या बहिणींचे फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे निवासस्थान आलेल्या या सर्व बहिणींचे असल्याची भावनाही व्यक्त केली.