बुलढाणा (CM Eknath Shinde) :
सकाळी म्हणावी आरती,
रात्री म्हणावी स्तोत्र..
दुपारच्या जेवणाची सोय असेलतर मात्र !
मुख्यमंत्री (CM Eknath Shind)e, दोन उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पालकमंत्री, जिल्ह्यातले जवळपास सर्वच आमदार अन् महायुतीचे नेते यांचे भरगच्च कार्यक्रम शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात होते. तब्बल 18 स्मारकांचे लोकार्पण, तीन शासकीय इमारतींचेही लोकार्पण व महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या प्रचार व प्रसाराचा भव्य कार्यक्रम.. अशा धावपळीत पोटापाण्याची सोय हवीच. ती व्यवस्था नेहमीच अतिशय सुग्रास पद्धतीने बुलढाण्यातील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल हिरोळे व हिरोळे परिवार (Hirole Family) करत असतो. याही वेळी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांसह, 2 उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, आमदार व महायुतीचे नेते हिरोळे परिवाराच्या या मेहमान नवाजीणे खुश झाले. अगदी पोटावर हात फिरवत ढेकर देत त्यांनी म्हटले, अन्नदाता सुखी भव:
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, श्वेताताई महाले, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर या सर्व आमदारांसह महायुतीच्या नेत्यांनी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अमोल हिरोळे यांच्या निवासस्थानी भेट देत तिथेच सुग्रास भोजनाचा आनंद घेतला. यावेळी या सर्वांचे सुरक्षा रक्षक व त्यांच्यासोबत आलेल्या स्टाफसाठीही जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम हिरोळे परिवाराकडून (Hirole Family) औक्षण करत व त्यांचा सत्कार करत स्वागत करण्यात आले. अमोल हिरोळे, त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. अंजली हिरोळे, पुत्र अर्चित हिरोळे व सुनबाई संगीता हिरोळे, नातू प्रिन्स या सर्वांनी मान्यवरांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांना होता उपवास…
गुरुवारचा दिवस असल्यामुळे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना उपवास होता. त्यांच्यासाठी खास साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे लाडू, विविध प्रकारची फळे व काही स्वीट्स मागविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनीही संवेणी त्यांचा आस्वाद घेतला. याचठिकाणी फ्रेश होऊन (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री जाहीर सभेसाठी रवाना झाले.