6 अर्ज बाद, 33784 प्रस्ताव दाखल
कारंजा/ वाशिम (CM Laadki Bahin Yojna) : महिलांच्या संसाराला हातभार लागावा, या उद्देशाने शासनाने (CM Laadki Bahin Yojna) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून, गेल्या 15 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत कारंजा तालुक्यातील 33784 लाडक्या बहिणींनी प्रस्ताव दाखल केले. त्या प्रस्तावाची छाननी (Karanja Tehsildar) तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती कार्यालयात सेतू केंद्र संचालकांच्या माध्यमातून सुरू आहे.
छानणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, एकूण अर्जापैकी 1343 अर्जात छाननी दरम्यान त्रुटी आढळून आल्या तर 6 अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. 31 ऑगस्ट या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे . त्रुटी आढळलेल्या (CM Laadki Bahin Yojna) लाडक्या बहिणींना या संदर्भातील संदेश भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी जेथून प्रस्ताव सादर केले तेथे जाऊन त्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करून अर्ज पुन्हा पाठवावे, असे आवाहन (Karanja Tehsildar) तहसीलदार कुणाल झालटे यांनी केले आहे.