शहरातील ४५ हजार संभाव्य पात्र महिला लाभार्थींच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु
अमरावती (CM Laadki Bahin Yojna) : महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (CM Laadki Bahin Yojna) सुरु करण्यात आली आहे. (Amravati Assembly Constituency) अमरावती विधानसभा मतदार संघात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी आ. सुलभाताई संजय खोडके (Sulabhatai Khodke) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून अमरावती तहसीलदार, महानगर पालिका आयुक्त, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी पश्चिम अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण अमरावती. तसेच दोन अशासकीय सदस्य यांचा समावेश आहे. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व अमरावती हे सदस्य सचिव म्ह्णून काम पाहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी (Amravati Assembly Constituency) अमरावती विधानसभा मतदार संघामध्ये सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली जात आहे. (CM Laadki Bahin Yojna) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांनी अर्जाची नाव नोंदणी करण्यासाठी राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करता येणार असून २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित ,परित्यक्त्या आणि निराधार व एकल महिला तसेच कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये शासनाकडून दरमहा १,५०० रुपये इतका लाभ मिळणार आहे.
दरम्यान योजनेसाठी विधानसभा क्षेत्रातून जवळपास ४५ हजार अर्ज प्राप्त झाले असून अर्जाची स्क्रूटीनी (पडताळणी ) करून संभाव्य पात्र महिला लाभार्थींची यादी आ. सुलभाताई खोडके (Sulabhatai Khodke) यांच्या अध्यक्षतेखालील सनियंत्रण समितीच्या वतीने येत्या दोन-तीन दिवसात बैठक घेऊन मान्यता देण्यात येणार आहे. तसेच या नंतर सुद्धा प्राप्त होणाऱ्या अर्जाची पडताळणी करून पुढील बैठक घेऊन मान्यता देणार येणार आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि त्यांची कुटुंबामधील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून व पात्र महिलांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तत्पर व सकारात्मक भूमिका बजावावी, अशी सूचना (CM Laadki Bahin Yojna) माझी लाडकी बहीण योजना अमरावती विधानसभा क्षेत्रीय समितीच्या अध्यक्ष आ. सुलभाताई संजय खोडके (Sulabhatai Khodke) यांच्या वतीने करण्यात आली.