मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पोर्टल बंद
हिंगोली (CM Ladaki Bahin Yojana) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना १ जुलै २०२४ पासुन प्रारंभ झाली. या योजनेत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात आले. एकुण ३ लाख २४ हजार ४१४ महिलांनी अॅप व पोर्टलव्दारे अर्ज दाखल केले. त्यातील ३ लाख १३ हजार २२६ लाभार्थी महिलांचे अर्ज मंजूर झाले. ५५७७ महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.
राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्पोटीत आणि निराधार महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (CM Ladaki Bahin Yojana) अंमलात आणली. किमान २१ पूर्ण व ६५ वर्ष असलेल्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी १ जुलै २०२४ पासुन योजनेला प्रारंभ करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात अॅपव्दारे १ लाख ७९ हजार २०९ महिलांनी अर्ज दाखल केले. ज्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील २७८१३, वसमत तालुक्यातील ४८६७३, हिंगोली तालुक्यातील ३५९६२, कळमनुरी तालुक्यातील ३५०१९ तर सेनगाव तालुक्यातील ३१७४२ महिलांनी अर्ज दाखल केलेत. ज्यामध्ये ४१७ महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत. यंत्रणेने प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर १ लाख ७८ हजार ४०६ लाभार्थी महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३४१ महिलांचे अर्ज नामंजूर तर ४३ महिलांचे अर्ज अशंत: नामंजूर करण्यात आले.
अॅपमध्ये १ लाख ७९ हजार २०९ लाभार्थी महिलांनी (CM Ladaki Bahin Yojana) अर्ज दाखल केले असता त्यातील १ लाख ७८ हजार ४०६ अर्ज मंजूर करण्यात आले. ३४१ अर्ज नामंजूर केले. पोर्टलव्दारे एकुण १ लाख ४५ हजार २०५ अर्ज प्राप्त झाले. त्यात १ लाख ३४ हजार ८२० अर्ज मंजूर झाले. तर ४१२० अर्ज नामंजूर झाले. ७०६ अर्ज अशंत: नामंजूर झाले आहेत. अॅप व पोर्टलव्दारे एकुण ३ लाख २४ हजार ४१४ महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यात ४१७ अर्ज प्रलंबित असुन ३ लाख १३ हजार २२६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ४ हजार ४६१ अर्ज नामंजूर केले असुन ७४९ अर्ज अशंत: नामंजूर केले आहेत. जवळपास ९६.६ टक्के लाभार्थी महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
१८ डिसेंबर पासुन पोर्टलच बंद
गैरसोय वाढली विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता संपूष्टात आल्यानंतर नविन शासन सत्तारूढ झाले. त्यानंतर या योजनेतील अनेक महिलांना मागील प्रलंबित हप्ते बँक खात्यावर वर्ग झाले. ज्या महिलांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना एकही हप्ता मिळाला नाही अशांची एकदाच रक्कम बँक खात्यात जमा झाली. परंतु बर्याच महिलांना अर्ज मंजूरचा संदेश येऊनही त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालीच नाही.
जिल्हास्तरावर कोणतीही माहिती मिळत नसल्याने लाडक्या बहिणी संतप्त
शासनाने महिलांना दिलासा देण्यासाठी ही योजना अंमलात आणली. योजनेत बहूतांशी महिलांना बँक खात्यात रक्कम मिळाली. बर्याच महिलांना अद्यापपर्यंत एकही हप्ता मिळाला नसल्याने त्यांच्या बँक व डाक विभागात अनेक चकरा होत आहेत. त्यांना कोणतीही माहिती मिळत नसल्याने (CM Ladaki Bahin Yojana) लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे या बहिणींना केंव्हा हप्ता मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




