कागदपत्राची जुळवा-जुळव करण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी
कळमनुरी/हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) आहे. या योजनेचे लाभार्थी २१ वर्षपासून तर ६० वर्ष वयोगटातील महिला राहणार आहेत. त्यामुळे या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे, आधार कार्ड, वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, बँकेचे पासबुक (Bank Passbook) ही कागदपत्रे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी कळमनुरी शहरातील व तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावांतून आलेल्या नागरिकांची तहसील कार्यालयावर सध्या झुंबड उडालेली आहे. तसेच गावागावातील तलाठी कार्यालय व ई सेवा केंद्रांवरही अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी महिला प्रामुख्याने दिसून येत होत्या.
तसेच अनेक ठिकाणी रेशनकार्डातील आपल्या नावाची दुरुस्ती किंवा नाव समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या (Supply Department) पुरवठा विभागात महिलांच्या रांगा लागलेल्या होत्या. स्टॅम्प पेपर घेण्यासाठी या योजनेच्या लाभासाठी काही महिलांना स्टॅम्प पेपरचीही गरज भासणार आहे. अशीच परिस्थिती सेतू कार्यालयावर सुद्धा होती तर ठिकठिकाणी ट्राफिक जाममुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. (City council) नगर परिषद कार्यालयापर्यंत रस्त्यावर मोठी गर्दी दिवसभर दिसून येत आहे. या योजनेसाठी आता ग्रामीण भागातील महिला व नागरिकांची दररोज गर्दी होणार आहे. तसेच शाळा महाविद्यालय प्रवेशासाठीही विद्यार्थी व त्यांच्या पालकांची गर्दी आता वाढलेली आहे. इतर कागदपत्र काढण्या साठीही विद्यार्थ्यांचीही गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
महा ई सेवा केंद्रामधून उत्पन्न प्रमाणपत्र
विशेष म्हणजे १ ते १५ जुलैपर्यंतच यासाठी अर्ज करण्याची मुदत राज्य शासनाने दिली आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नागरिकांना मोठी कसरत होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी (CM Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा करताच या योजनेची माहिती घराघरापर्यंत पोहोचली आणि १ जुलै पासुन तहसील कार्यालय, तलाठी, ई-सेवा केंद्रावर महिलांची या योजनेच्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी गर्दी उसळली. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी स्टॅम्प घेणे, नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्ड यासाठीही नागरिकांची धावाधाव होताना दिसून आली.
वय व अधिवास प्रमाणपत्र मिळणारी वेबसाईड जाम
राज्यभरातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरू झाली असून या योजनेसाठी लागणारे सेतू सेवा केंद्रामधून उत्पन्न प्रमाणपत्र व वय व (Domicile Certificate) अधिवास प्रमाणपत्र देण्याची अट असून हे प्रमाणपत्र काढण्यासाठी शहरातील महा-ई-सेवा केंद्रावर मोठी गर्दी होत आहे परंतु उत्पन्न प्रमाणपत्र व वय व (Domicile Certificate) अधिवास प्रमाणपत्र ज्या साईड वरून प्राप्त होते ती साईड जाम झाल्याने सदरील प्रमाणपत्रे काढण्यासाठी (Bank Passbook) कागदपत्र अपलोड होत नाही. यामुळे महिलांना तासंतास रांगेत उभे राहून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने सदरील साईड लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.
जाचक अटी असल्याची ओरड!
या योजनेच्या लाभासाठी शासनाने जाचक अटी लादल्याचा आरोप महिलांकडून होत आहे. यासाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच घरातील कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आत असावे, घरातील कोणी शासकीय नोकरीवर नसावा किंवा सेवानिवृत्त वेतनधारक नसावा, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर योजनेचा दीड हजार रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा व कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे तसेच ५ एकराच्या आत त्याच्याकडे शेती असावी या व इतर प्रकारच्या अटी या योजनेसाठी आहेत. त्यामुळे ह्या जाचक अटी असल्याचा आरोप महिलांकडून होत आहे.