अर्जाची संख्या मर्यादित झाल्यानंतर शासन निर्णय
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दीड हजार रुपये महिन्याला देण्यात येत आहे. या (CM Ladki Bahin Yojana) योजनेमध्ये लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केले. सुरुवातीला विविध अडचणी निर्माण झाल्या. जवळपास ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. मात्र आता अर्जाची संख्या मर्यादित झाल्याने केवळ अंगणवाडी केंद्रामध्ये (Anganwadi sevika) अंगणवाडी सेविकांमर्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज सादर करावे अर्ज लागणार आहेत.
‘मुख्यमंत्री माझी योजनांतर्गत (CM Ladki Bahin Yojana) महिलांचे लाडकी अर्ज बहीण’ राज्यात स्वीकृतीसाठी (Anganwadi sevika) अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त प्राधिकृत देण्यात इतर व्यक्तींना आलेले अधिकार रद्द करण्यात आले. ६ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फतच स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या योजनेत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली.
यापूर्वी अर्ज स्वीकारण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, (Anganwadi sevika) अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्षप्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्रआदी ११ प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते. आता ६ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकामार्फतच आपले अर्ज सादर करावे, असे कळविले आहे.
■ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला (CM Ladki Bahin Yojana) मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने या योजनेमध्ये अर्ज दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला योजनेत अर्ज भरण्यासाठी विविध अडचणी आल्यात. कधी सर्वरची अडचण आली तर कधी इतर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे लाभार्थ्यांना अर्ज भरताना त्रास सहन करावा लागला होता. आता अर्जाची संख्या मर्यादित झाल्याने (Anganwadi sevika) अंगणवाडी सेविकमार्फत अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.