बँकेसमोरील रांग पाहून अनेकांना नोटबंदीच्या आठवणी झाल्या जागृत
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली असून त्यांच्या बैंक खात्यावर पहिला हप्ता ३ हजाराचा वर्ग करण्यात आला आहे. काही बँकांमध्ये लाडक्या बहिणींना उभे राहण्याकरीता जागा नसल्याने चक्क रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. यातूनच काहींना नोटबंदीच्या आठवणींना उजाळा मिळाला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) अंमलात आणल्यानंतर अनेक महिलांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकाळपासूनच हजारो महिला बैंकेसमोर रांग लावून उभ्या राहत आहेत. त्यातच काही महिलांची घुसखोरी होत असल्याने वादविवादाच्या घटना घडत आहेत.त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरीता महिला पोलिसही तैनात केले आहेत. दिवसभर महिलांची एकसारखी रांग होती. विशेष म्हणजे भारतीय स्टेट बैंक शाखा हिंगोली येथे मात्र महिलांची सर्वाधिक गर्दी होती.
बँकेमध्ये लाडक्या बहिणींना (CM Ladki Bahin Yojana) उभे राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांना चक्क रस्त्यावर उभे राहावे लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधुनमधून विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी नोटबंदी करण्यात आली होती. त्यावेळी देखील बँकांसमोर अशीच रांग दिसून येत होती. त्यामुळे अनेकांना नोटबंदीची आठवण झाली.