हिंगोली मतदार संघात आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यातर्फे शिबिर घेण्याचा संकल्प
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजनेच्या अनुषंगाने आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी प्रभाग निहाय व गाव निहाय शिबिर घेण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून माझी एकही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही व प्रत्येकाला योजनेचा लाभ घेता आला पाहिजे, त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन संपूर्ण विधानसभा मतदार संघात करण्याचे ठरवले. त्यानुसार १३ रोजी प्रभाग क्रमांक १ आदर्श कॉलेज, हिल टॉप कॉलनी व प्रभाग – क्रमांक ५ जिजामाता नगर, आंबेडकर नगरमध्ये या शिबिर घेण्यात आले. त्यात अनेक बहिणींची नाव नोंदणी करण्यात आली.
प्रत्येक प्रभागात अशा पद्धतीच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून ज्यांनी आणखी अर्ज केले नाहीत त्यांचे अर्ज भरून घेतल्या जाणार आहेत. शिवाय इतर योजनांची ही माहिती सांगून त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची रक्कम येत्या १७ ऑगस्टला रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून महायुती सरकार बहिणीच्या खात्यात टाकणार आहे. ज्या बहिणी यापासून वंचित राहिल्यात व ज्यांच्या अर्जामध्ये दुरुस्त्या
आहेत अशा बहिणीसाठी या पद्धतीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शहरांमध्ये शहराध्यक्ष कैलास काबरा, सि.एम.ओ. कार्यालयाचे पथक व कार्यकर्त्यांनी केले. प्रभाग १ व ५ मध्ये जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तालुकाध्यक्ष माणिकराव लोडे, शहराध्यक्ष कैलासचंद्र काबरा, महिला शहराध्यक्ष अलका लोखंडे, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, हमीदभाई प्यारेवाले,आशिष जयस्वाल, सदाशिव सूर्यतळ, माजी नगराध्यक्ष अनिताताई सूर्यतळ, सुनंदा मिश्रा, सुधीर पोपलाईतकर, सखारामजी मुटकुळे, आशिष शर्मा,अभिषेक सूर्यवंशी, पुरुषोत्तम राऊत,मोहित अग्रवाल, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.