महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात बहिणींशी साधला संवाद
जळगाव (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी (Ladki Bahin Yojana) राज्यभरात विविध अफवा पसरविल्या जात असून बहिणींचे हित विरोधकांना बघितले जात नाही. त्यामुळे ‘ताई माई अक्का, सावत्र कपटी भावांना मारा बुक्का ‘, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगाव येथे केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत आज जळगावातील सागर पार्क येथे जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी सुसंवाद साधताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व मान्यवर उपस्थित होते.
एक तास उशिरा आगमन झाल्यानंतरही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांचे महिलांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच उभे राहून मोबाईल टॉर्च टाखवून व हात उंच करून अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या पोटात दुखत आहे. दीड हजार रुपयात काय होते, बहिणींना लाच देता का?, हे पैसे परत घेतले जातील, अशा अफवा पसरवत आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एक फुटकी कवडी देखील माझ्या बहिणींना दिली नाही आणि आता वेगवेगळ्या अफवा पसरवीत आहेत.
मात्र बहिणींनो, या अफवांकडे आपण लक्ष देऊ नका. ज्यांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार नाही. त्यांच्या खात्यात तातडीने पुढील कालावधीत पैसे जमा करण्यात येतील. केवायसी व आधार कार्ड विषयी खाते किंवा मोबाईल क्रमांक संलग्न नसल्यास सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यात पडतील, असा तुमच्या भावावर विश्वास ठेवा, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाने सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेवर व राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.
एक कोटी चाळीस लाख अर्ज
राज्यभरातून एक कोटी 40 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. 46 हजार कोटी रुपये या (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी लागणार असून आम्ही तरतूद केली आहे. काही कारणाने अर्ज न भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करू नये, पुढील पाच वर्ष ही योजना सुरू राहील,असेही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणाले.