उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून नवी आश्वासकता व विश्वास राज्यातील बहिणींना मिळाला आहे. या योजनेला राज्यातील महिलांनी दिलेला अपूर्व प्रतिसाद लक्षात घेवून या योजनेच्या जोडीला आणखी काय देता येईल, याचा प्रयत्न शासन करीत आहे. कोणत्याही स्थितीत ही योजना तेवढयाच सक्षमपणे राबवू. या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन घडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन
रेशीमबाग मैदानावर शनिवारी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) दुसर्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मंचाच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या खास डिजीटल यंत्राची कळ दाबून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५२ लाख महिलांच्या बँक खात्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसर्या टप्प्याच्या लाभाचे थेट वितरण केले. नागपुरात महिलांना १ हजार ४०३ पिंक ई-रिक्षा दिल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. विशेष मंचावर प्रवेश करताच महिलांनी हात उंचावून आणि राखी बांधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञभाव व्यक्त केला. त्यांनी उपस्थित महिलांवर पुष्पवृष्टी करुन महिलांचे अभिनंदनही केले.
यावेळी मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आलेल्या सर्व महिला भगिनींना भेटून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. यावेळी काही बहिणींनी राख्याही बांधल्या. https://t.co/OL0T7rVEIh pic.twitter.com/JfPUPnqocT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 31, 2024
महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य -नितीन गडकरी
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा एक मोठा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. राज्यातील महिलांमध्ये या योजनेमुळे उर्जा संचारली असून या लाभातून महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाले आहे. यातून त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. सामाजिक समतेसोबतच आर्थिक समता प्रस्थापित होण्यास या योजनेची मोठी मदत होणार आहे. शोषित, पीडित आणि वंचित समुहातील महिलांना यातून जगण्याचा नवा विश्वास मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मेळाव्यात फुलांची उधळण करत, राखीच्या बंधासह लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्साहात स्वागत केले!@Dev_Fadnavis #Maharashtra #Nagpur #MajhiLadkiBahinYojana pic.twitter.com/IS6u8eKI6L
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 31, 2024
महिला कल्याणाच्या योजनांसाठी ७५ हजार कोटी – अजित पवार
या योजनेसंदर्भात करण्यात आलेल्या अपप्रचाराला आता उत्तर मिळाले असून तिच्या अंमलबजावणी संदर्भात पसरविण्यात आलेली नकारात्मकता अनाठायी असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) म्हणाले, ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी असून ही भविष्यातही कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे. या (CM Ladki Bahin Yojana) योजनेसोबतच सिलेंडर वाटप, मोफत शिक्षण अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार त्यासाठी ७५ हजार कोटी रुपयाचा निधी खर्च करत आहे. महिलांना सबळ, सक्षम, सन्मानीत आणि सुरक्षित करण्याचे काम राज्यातील विद्यमान सरकारकडून करण्यात येत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सजग आहोत, अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले.
प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना लाभाचे धनादेश वितरीत
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) प्रातिनिधीक दहा लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच १० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना आणि महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभही प्राथमिक स्वरूपात वितरित करण्यात आले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी, पोलीस आयुक्त डॉ. सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदींना उत्तम आयोजनासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
🟣महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' टप्पा- 2 निधी वितरण शुभारंभ@nitin_gadkari @mieknathshinde @AjitPawarSpeaks#Maharashtra #Nagpur #MajhiLadkiBahinYojana pic.twitter.com/Nbt5x9ijmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 31, 2024
ही (CM Ladki Bahin Yojana) योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत, असे आवर्जून नमूद केले. राज्याच्या तिजोरीत भाऊ आणि बहिणींचेच पैसे जमा आहेत. तेच त्यांना परत करत असल्याचे सांगितले. राज्यातील बहिणींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच आमचे खरे समाधान आहे. या योजनेने आतापर्यंतचे सगळे रेकोर्ड मोडीत काढले आहेत. आज या योजनेचा टप्पा दोन सूरु झाला असून यापुढे तिसरा टप्पाही करू, असे स्पष्ट केले.