पुसद (CM Ladki Bahin Yojana) : महायुती सरकारच्या आजपर्यंतच्या काळातील अत्यंत उपयुक्त व लोकप्रिय ठरलेली (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ” याकरिता राज्य शासनाच्या सर्वच विभागातील विशेष करून महिला व बालकल्याण विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 21 वर्ष ते 65 वर्षे वयोगटातील महिलांचे अर्ज घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सर्वच विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी अत्यंत उपयुक्त व लोकप्रिय ठरलेल्या या योजनेकरिता आपले योगदान देण्यास तत्पर झालेले आहेत.
विशेष करून यामध्ये आज पर्यंत कोणत्याही शासकीय योजनांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे योगदान ज्या पद्धतीने शासनाच्या निर्देशानुसार असायला हवं त्याच्या पलीकडे जाऊनही या योजनेकरिता हे शासनाचे अधिकारी कर्मचारी झटताना दिसत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं. (Pusad Municipality) पुसद मध्ये उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार महादेवराव जोरवर, नायब निवासी तहसीलदार गजानन कदम, नायब तहसीलदार विवेक इंगोले, प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, साहेब गटविकास अधिकारी संजय राठोड, महिला व बालकल्याण विभागाची विभागीय अधिकारी माने, (Pusad Municipality) पुसद नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, नगरपालिकेचे महिला व बालकल्याण विभागाची उबाळे, (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडली बहीण नगरपालिका नोडल अधिकारी कुरमे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने कामाला लागलेली दिसत आहेत हे विशेष. तर राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी येत्या रक्षाबंधनावर पात्र लाडल्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्याची घोषणा केलेली आहे हे विशेष.