डोंगरकडा, भाटेगावचे ग्रामविकास अधिकारी तडकाफडकी निलंबित
डोंगरकडा/हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, भाटेगाव येथील ग्रामविकास अधिकारी एम.सी. घनसावंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना रहिवाशी प्रमाणपत्र देण्याकरीता लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने (Group Development Officer) कळमनुरी गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांनी (Gram Panchayat) ग्रामविकास अधिकारी घनसावंत यांच्या निलंबनाचे आदेश गुरूवारी रात्री काढले.
मिळालेली माहिती अशी की, शासनाने नुकत्याच अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या (CM Ladki Bahin Yojana) योजनेत महिलांना १५०० रूपये प्रती माह दिले जाणार आहे. त्यासाठी अनेक महिला कागदपत्राची जुळवा जुळव करण्यात धडपड करीत आहेत. या योजनेकरीता रहिवाशी प्रमाणपत्र घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात व महा-ई-सेवा केंद्रावरही मोठी गर्दी होत आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व भाटेगाव (Village Development Officer) ग्रामपंचायतचे (Gram Panchayat) ग्रामविकास अधिकारी एम.सी.घनसावंत हे महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी ५० रूपयाचे शुल्क लावत असल्याचे ग्रामस्थांसमोर सांगितले. भाटेगाव येथे रहिवाशी प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यासाठी १०० रूपये घेतल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या प्रकाराची जि.प. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार यांनी गंभीरतेने दखल घेऊन सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश केले होते. यावरून कळमनुरी गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी विकास पाईकराव, भगवान झरकर यांच्या पथकाने भाटेगाव येथे जाऊन प्रत्यक्ष तक्रारीची चौकशी केली असता काही लाभार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी १०० रूपये घेतल्याचे सांगितले. (CM Ladki Bahin Yojana) ज्यामध्ये लाभार्थ्यांनी रकमेची पावती मागणी केली असता पावतीबुक संपल्याचे घनसावंत यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकूण चौकशी दरम्यान लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने (Village Development Officer) ग्रामविकास अधिकारी एम.सी. घनसावंत यांच्या निलंबनाचे आदेश ४ जुलै रोजी काढण्यात आले. यामध्ये एम.सी.घनसावंत यांनी भाटेगाव व डोंगरकडा ग्रामपंचायत सचिव पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबनानंतर एम.सी.घनसावंत यांचे मुख्यालय पंचायत समिती विभाग जिल्हा परिषद हिंगोली हे असून जि.प. सिईओंच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.