मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंमलात आणली असून अनेक महिलांच्या बँक खात्यावर रक्कमही वर्ग झाली आहे परंतु काही महिलांचे आधार खात्याशी संलग्न असल्याने शनिवारी सकाळपासूनच बँकांमध्ये महिलांची तोबा गर्दी पोलिसांनाही पाचारण करण्याची वेळ आली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) जिल्ह्यात जवळपास २ लाख 35 हजार महिलांनी फॉर्म भरलेले आहे. यातील १ लाख ७६ हजार पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या बँक खात्यात पहिला हप्ता तीन हजार रुपयाचा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यातील अनेक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग झाली असून त्यांना मोबाईलवर संदेशही प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक महिलांनी या योजने करता अर्ज दाखल केलेले असताना त्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न झालेले नाही. ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा संदेश प्राप्त झाला नाही अशा महिलांनी 16 ऑगस्ट रोजी अनेक बँकांमध्ये मोठी गर्दी केली होती सर्व बँकांमध्ये फक्त महिलांचीच गर्दी अधिक होती बँकेच्या बाहेरही महिलांची रांग लागल्याने काही ठिकाणी महिलांची तू तू मै मै होऊ लागली त्यातच शाब्दिक बाचावाची आणि वाद वाढत असल्याने काही ठिकाणी बंदोबस्त करता पोलिसांना पाचारण करावे लागले वाहतुकीसही अडथळा निर्माण होऊ नये त्या दृष्टीने बँकांसह उपस्थित महिलांना पोलिसांनी सूचना दिल्या. बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक झाली होती.
आधार सीडींग करून घ्यावे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) या योजनेच्या लाभासाठी दाखल केलेल्या फॉर्ममध्ये आधार सिडिंग बँक खाते दिलेले असतील, त्यांच्या खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जमा सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास तात्काळ बँक खाते आधारशी संलग्न करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.