महीला सरपंचांनी युवकाच्या तोंडावर मारले
अर्जुनी/मोर (CM ladki Bahin Yojana) : लाडकी बहीण योजनेसाठी युवक (Gram Panchayat) ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव बांध (Navegaon Bandh) येथे जन्माचा दाखला मागण्यासाठी गेले असता कार्यालयात बसून असलेली सरपंच सौ हिराबाई नीलमचंद पंधरे राहणार खोली नवेगाव बांध यांनी आशिष सुभाष लंजे वय 20 वर्ष नवेगाव बांध दाखला मागण्यासाठी गेले. सरपंच बाईने युवकाच्या कानपटात मारले. सदर घटना दुपारी 11:00 वाजताची असून, युवक आशीष लंजे हा ग्रामपंचायत नवेगाव बांध (Navegaon Bandh) येथील रहिवासी आहे.
ग्रामपंचायत (Gram Panchayat) वन समितीच्या वतीने हिल टॉप गार्डन वरती काम पाहत होता. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता काही दिवसाआधी त्याला कामावरून काढण्यात आले. सरपंच हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यानीपैशाचा हिशेब न दिल्यामुळे मारल्याचे कबूल केले. युवकांनी सरपंच सौ हिराबाई पंधरे यांच्या विरोधात (Navegaon/Bandh Police) पोलीस मुख्यालय नवेगाव बांध येथे तक्रार नोंदविण्यात आली.