मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत साडी चोळी व मानधन देऊन गौरव
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : महायुती शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली व त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा वर्कर व गटप्रवर्तकावर टाकली. या सर्व सेविका योजनेची घोषणा झाली त्या दिवशीपासून सर्वसामान्य बहिणींना योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) लाभ घेता यावा म्हणून घरोघरी जाऊन माहिती सांगून त्यांचे अर्ज भरून घेत आहेत. या सर्व सेविकांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे (MLA Tanajirao Mutkule) यांनी एका कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्याची घोषणा केली.
त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रथम महिला 51 हजार रुपये नगदी,सन्मानपत्र व साडी चोळी तसेच प्रोत्साहन पर 11 महिलांना 11 हजार रुपये देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी दिनांक 16 रोजी आपल्या यमुना या निवासस्थानी भव्य असा कार्यक्रम घेऊन आपल्या (CM Ladki Bahin Yojana) बहिणींना गौरवण्याचा निर्णय घेतला. आज रोजी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ,आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे यथाचे स्वागत करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार साडीचोळी व पुरस्कार देऊन केला.
यावेळी हिंगोली व सेनगाव तालुक्यातील सर्व पुरस्कार विभागून देण्यात आले. हिंगोली विभागातून 11भाग्यवान महिला 1) रंजना आसाराम भिसे,2) अलका परसराम जाधव 3) महानंदा नथुजी काळे 4) सुनिता भागवत काळे 5) अनिता जनार्दन कल्याणकर 6) सुरेखा दत्ता भोयर 7) भगीरथी किशन चिलगर 8) दुर्गा नागोराव जगताप 9) सरस्वती विष्णू दवंड 10) रंजना प्रल्हाद चाटसे 11) रमाबाई कुंडलिक पंडित या आहेत तर 51 हजार रुपये मानधन पुरस्कार प्राप्त महिला केसापूर येथील अनिता सुदाम इंगोले या आहेत . तसेच सेनगाव विभागातील 11 भाग्यवान महिला 1) अनुसयाबाई शिकारे 2) अशा प्रकाश अंभोरे 3) रंजना नामदेव जाधव 4) रामकौर बबन टोंचर 5) पंचफुला निवृत्ती ठोके 6) मंगलाबाई काकडे 7) दशरथ धाबे 8) विद्या हांडे 9) सुनिता सरकटे 10) गणेश काचकुंडे 11) बबीता धाबे यांना 11 हजार रुपये देऊन गौरवण्यात आले तसेच 51 हजार रुपये दिले यांना विजयकांता कच्छवे गौरवण्यात आले.
यावेळी बऱ्याच मान्यवरांची भाषणे झाली. तसेच महिला गटप्रवर्तक यांनी सुद्धा आपले विचार मांडले व जो भाऊ आमच्या पाठीमागे उभा आहे. तोच भविष्यात पुढील आमदार राहील अशी घोषणा सुद्धा केली. तसेच माननीय आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे जे काही प्रश्न मानधनासंबंधी आहेत, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची वचन दिले. यावेळी कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांबळे, जिल्हा अध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, ज्येष्ठ नेते के के शिंदे, मिलिंदजी यम्बल,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपाचे दुर्गादास साकळे, जिजाबाई मुटकुळे, राजामती मुटकुळे, शिवाजीराव मुटकुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.