मुकेश मासुरकर यांची घणाघाती टीका
नागपूर (CM Ladki Bahin Yojana) : १ एप्रिल पासून ३७ टक्के वीजबिलात वाढ झाल्याने जनतेला अव्वाच्या सव्वा बील येत आहे. वीज बिलाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जनतेची लूट सुरू केली आहे. ७० रुपये किलो विकणारी चना डाळ ११० रुपये, तुर डाळ १३० वरून २०० रुपये प्रति किलो दराने मिळात आह. दैनंदिन आहार महाग होत आहे. परंतु शेतकर्याच्या मालाला भाव नाही. जिल्हा परिषद शाळेत मुलांना मिळणारा गणवेश २ वर्षांपासून मिळालाच नाही. महागाई वाढवून किंवा इतर मार्गाने घरातील माणसांकडून १० पटीने पैसे उकळायचे व त्यातूनच १५०० रुपये (CM Ladki Bahin Yojana) बहिणीच्या नावाने त्यांच्याच घरच्या महिलेच्या बँक खात्यात जमा करायचे, ही योजना फक्त बोर दाखवून आवळा काढण्या सारखी आहे, अशी घनाघाती टीका जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते मुकेश मासुरकर (Mukesh Masurkar) यांनी केली.
महाराष्ट्र सरकारवर आजच्या घडीला ८ लाख ११ हजार कोटी रुपये कर्जाचे डोंगर आहे व २०२४-२५ च्या अंतरिम बजेट मध्ये ३.५ टक्के तूट म्हणजेच महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना (CM Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. याकरीता महाराष्ट्र सरकारला सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी लागणार म्हणजेच वर्षाला ४ कोटी ६० लाख रुपये लागणार आहे. कर्जबजारी सरकार एवढा निधी आणणार कुठून? म्हणून लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकी पुरतीच दिसून येते. सरकारला ही योजना खरोखर राबवायचीच असती तर १ एप्रिल पासूनच राबवली असती, चार महिने का लांबविली ? असा सवालही मासुरकर (Mukesh Masurkar) यांनी उपस्थित केला.
विदर्भाचा बॅकलॉग आधीच वाढीत आहे. महाराष्ट्रात अगोदर ज्याही योजना राबविण्यात आले, त्यात विदर्भाचाच बळी गेला. पुन्हा विदर्भाला लुटून लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) राबविण्यात येणार आहे. युवकांना रोजगार देऊ शकत नाही म्हणून ही अफूची गोळी दिली जात आहे. कारण तुम्ही रोजगार मागायचा नाही. आरोग्याच्या सुविधा मागायच्या नाही. तुमच्या सर्व मागण्यांवर दुर्लक्ष करायचे. ज्या मागण्यांकरीता जनता रस्त्यावर येते त्या कधीच पूर्ण करायच्या नाहीत. राज्यात एकाही (CM Ladki Bahin Yojana) बहिणीने लाडकी बहीण योजना राबवावी याकरीता आंदोलन तर सोडा मागणी सुद्धा केली नाही.
बहिणींनी सुरक्षेकरीता बरेचदा आंदोलने केलीत, राज्यात दररोज २५-३० अत्याचाराच्या घटना घडतात परंतु सरकारला त्याची चिंता नाही. आरोग्याकरीता त्यांना जागोजागी भटकंती करावी लागते. राज्यात आरोग्य विभागाच जवळजवळ एक तृतीयांश जागा रिक्त आहेत. पोलीस खात्यात ४९ हजार जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवायला होता, याकडेही मासुरकर (Mukesh Masurkar) यांनी लक्ष वेधले.