नम्रता आणि प्रसाद सोबत धम्माल
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसर्या टप्प्याचे शनिवारी नागपुरात शुभारंभ झाले. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने व नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रेशीमबाग येथील मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत ‘लाडक्या बहिणींनी’ उपस्थिती दर्शविली. या (CM Ladki Bahin Yojana) कार्यक्रमात उपस्थित भगीनींसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आली होती.
सुप्रसिद्ध गायीका वैशाली सावंत यांची बहारदार गाण्यांची प्रस्तुती आणि ‘हास्य जत्रा’ फेम नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरांची जुगलबंदी महिला भगीनींनी चांगलीच ‘एंजॉय’ केली. वैशाली सावंत यांनी स्टेजवर येताच त्यांचे गाजलेले गीत ‘ऐजा दाजीबाष्ठ.’ सादर करताच संपूर्ण सभापंडात भगिनींनी हातवारे करुन दाद दिली आणि ठेका धरला. पुढे वैशाली सावंत यांनी ‘गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली’, ‘खेळू झिम्मा’ यासह ‘हात नका लावू माझ्या साडीला’ ही लावणी तसेच ‘नको मारू कान्हा’ ही गवळण, गोंधळ, ‘जत्रा’ फेम ‘कोंबडी पळाली’ यासोबतच गणेशोत्सवात लाँच होणारे त्यांनी श्रीगणरायावरील नव्याकोर्या गाण्याचे सादरीकरण केले.
तर त्यापूर्वी ‘हास्य जत्रा’ फेम नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरांची यांनी संपूर्ण मंचाचा ताबा घेतला. सभामंडपात रॅम्पवरुन फेरफटका मारून भगीनींशी संवाद साधला. त्यांच्याकडून उखाणा, डान्स करवून घेत पैठणी भेट दिली. (CM Ladki Bahin Yojana) कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणींची’ हाऊसफुल्ल गर्दी झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये देखील व्यवस्था करण्यात आली. भगिनींनी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये लाईव्ह कार्यक्रमाचा आनंद लुटला. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आरजे आमोद आणि श्यामल देशमुख यांनी केले.